सध्या सोशल मीडियावर सगळ्यांना वेड लावलं आहे ते म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील गाण्यानं. सध्या चर्चेत आहे ते गाणं म्हणजे ‘बहरला हा मधुमास’. या गाण्यावर सगळेच रील व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करताना दिसत आहेत. या गाण्यानं फक्त मराठी लोकांना नाही तर अनेक हिंदी सेलिब्रिटींना देखील वेड लावलं आहे. तुम्हाला या वर विश्वास बसत नसेल पण असं झालं आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीनं सोशल मीडियावर ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर रील व्हिडीओ शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवोलिनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत देवोलिनानं पैठणी साडी नेसली आहे. देवोलिनाच्या या साडीचा रंग लाल आणि हिरवा आहे. हातात हिरव्या बांगड्या व पारंपरिक दागिन्यांचा साज करत मराठमोळा लूक केला आहे. देवोलिनानं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तर देवोलिनानं अप्रतिम डान्सही केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत देवोलिनानं कॅप्शन दिलं की कारण हे सध्या ट्रेन्ड करत आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


देवोलिनाच्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, क्यूट. दुसरा नेटकरी म्हणाला, महाराष्ट्रीयन मुलगी. तिसरा नेटकरी म्हणाला, तुला पाहून अनेकांना खूप बरं वाटतं. तिसरा नेटकरी म्हणाला, प्यूर मराठी लूक खूप सुंदर दिसते. अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी देवोलिनाच्या व्हिडीओवर केल्या आहेत. 


फक्त देवोलिना नाही तर ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर सोशल मीडिया स्टार किली पॉल आणि अमेरिकनं सोशल मीडिया स्टार रिकी पॉंडनं देखील रील व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्य झालं होतं. त्यांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. 


हेही वाचा : Samantha Ruth Prabhu च्या 'या' चित्रपटांना Top Rating; तुम्ही पाहिले का?


महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट शाहीर साबेळ यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. तर शाहीर साबळे यांची भूमिका अभिनेता अंकुश चौधरी साकारत आहे. तर चित्रपटाच्या माध्यामातून केदार शिंदे यांची लेक सना शिंदे ही अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तर सना शिंदे ही या चित्रपटात भानुमती साबळे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.