Sonarika Bhadoria got married : छोट्या पडद्यावरील पार्वतीची भूमिका साकारूण सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी म्हणजे अभिनेत्री सोनारिका भदौरिया. सोनारिका भदौरियानं 'देवों के देव महादेव' या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारली होती. सोनारिका आता तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे तिच्या लग्नाची ग्रॅंड वेडिंगची देखील चर्चा रंगली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनारिका भदौरियानं 2022 मध्ये अनेक वर्षांपासून डेट करत असलेल्या विकास पराशरशी साखरपुडा केला होता. त्यानंतर आता त्यांनी लग्न केलं आहे. काल म्हणजेच 18 फेब्रुवारी रोजी सोनारिका आणि विकास यांना कुटुंबासमोर सप्तपदी घेतल्या आहे. त्यांच्या लग्नात कुटुंबातील लोक आणि जवळचे मित्र परिवार उपस्थित होते. त्या दोघांचं लग्नाचं ठिकाण हे राजस्थानचं रणथंभौर होतं. त्याची झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सोनारिका आणि विकासच्या लग्नासाठी एक ग्रॅन्ड सेटअप करण्यात आलं होतं. यावेळी सोनारिका ही भावूक झाली. व्हिडीओमध्ये पाहायला मिळतय की सोनारिकानं लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. तर विकासनं क्रिम रंगाची शेरवानी परिधान केली आहे. तर जेव्हा सोनारिका आणि विकास हे स्टेजवर असतात तेव्हा विकास हा तिच्या चेहऱ्यावरून ओढणी काढताना दिसतो. त्यानंतर सोनारिका जेव्हा विकासकडे पाहते तेव्हा त्याला पाहून सोनारिका भावूक होते. त्यानंतर ते एकमेकांना वरमाळा घालतात. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सोनारिका आणि विकासच्या वेडिंगचा लूकची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यासोबत सोनारिकाच्या दागिन्यांनी देखील सगळ्यांची मने जिंकली. तर तिचा ग्लॉसी मेकअप आमि मेसी हेअरस्टाईल नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे. विकास विषयी बोलायचे झाले तर तो एक बिझनेसमॅन आहे. 


हेही वाचा : प्रभासच्या 'कल्‍क‍ि 2898 AD' च्या सेटवरील फोटो लीक, कारवाई करण्याची मागणी


3 डिसेंबर रोजी सोनारिकानं आपल्या बॉयफ्रेंड विकास पाराशरसोबत रोका होण्याची घोषणा केली होती. तिनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत लिहिले होते की '3-12-2022 माझ्या आयुष्यातील माझं सगळं प्रेम. मला कायमसाठी गिफ्ट मिळालं आहे. या आशीर्वादासाठी मी आभारी आहे. हॅपी हॅपी रोका. तर सोनारिका आणि विकासची भेट ही जीममध्ये झाली होती. त्या दोघांनी एकमेकांना अनेक डेट केलं होतं.