धडकने ५ व्या दिवशी कमावले `इतके` कोटी
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरचा धडक सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच जलवा आहे.
मुंबई : जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरचा धडक सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच जलवा आहे. प्रदर्शनानंतर ५ व्या दिवशीही सिनेमाने जबरदस्त कमाई केली आहे. धडक सिनेमाने पहिल्या दिवशीच करण जोहरच्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर'चा रेकॉर्ड ब्रेक केला. त्याचबरोबर लवकरच आलियाच्या राझीचा ही रेकॉर्ड धडक तोडले, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. धडकचे पाचव्या दिवसाचे कलेक्शन ४४ कोटी झाले आहे. तर राझीचे पाचव्या दिवसाचे कलेक्शन ४५.३४ कोटी होते. त्यामुळे राझीचा रेकॉर्ड धडक सहज तोडू शकते.
केली इतकी कमाई
धडक प्रदर्शनानंतर शुक्रवारी सिनेमाने ८.७१ कोटींचा बिजनेस केला. तर शनिवारी ११.०४ आणि रविवारी ही कमाई १३.९२ कोटी इतकी झाली. सोमवारी सिनेमाचे कलेक्शन ५.५२ कोटी होते तर मंगळवारी धडकने एकूण ४४.१९ कोटींचा बिजनेस केला.
हा सिनेमा लावेल का धडकच्या कमाईला ब्रेक?
या सिनेमाची कमाई पाहता जान्हवी आणि ईशानची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असल्याचे दिसून येते. कमाईसाठी सिनेमाकडे अजून दोन दिवस बाकी आहेत. कारण त्यानंतर संजय दत्तचा साहब, बीबी आणि गॅंगस्टर हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. त्यामुळे धडकच्या वेगाला ब्रेक लागू शकतो.
काय असेल धडकची पुढील वाटचाल?
धडक सिनेमा भारतात २२३५ स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आला. तर परदेशात धडकला ५५६ स्क्रिन्स मिळाल्या. म्हणजेच जगभरात धडक हा सिनेमा २७९१ स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला. आता येत्या शुक्रवारी या स्क्रिन्सची संख्या कमी होतील. त्यामुळे मग सिनेमा किती कमाई करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.