मुंबई : टीम इंडियाचा स्टार प्लेअर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप जास्त फेमस आहे. ती रिल्स आणि डान्सचे व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता धनश्री वर्माने चक्क सौंदर्यवती माधुरी दीक्षितसोबत डान्स केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माधुरी दीक्षितसोबत केलेल्या डान्सचा व्हिडीओ धनश्रीनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. माधुरी दीक्षित सुंदर हावभाव करत डान्स करत आहे. तर धनश्रीही उत्तम डान्स करत आहे. पण माधुरी दीक्षितला तोड नाही असंच हा व्हिडीओ पाहून म्हणावं लागेल. 


हा व्हिडीओ आतापर्यंत 1.7 लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे. धनश्री वर्माने सोमवारी आपल्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला. माधुरी दीक्षित नुकतीच एक OTT वरील सीरिजमध्ये दिसली होती. 


धनश्रीने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की हा फक्त सोमवार नाही तर आयुष्यभराची प्रेरणा आहे. आम्हाला आवडणाऱ्या माधुरी दीक्षित यांच्यासोबत डान्स करायला मिळाला असंही तिनं पुढे म्हटलं आहे. धनश्री वर्माच्या व्हिडीओची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.