मुंबई : झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत नंदिनी वहिनींची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर प्रेक्षकांची लाडकी आहे. प्रेक्षकांची हीच लाडकी अभिनेत्री एक गोड बातमी घेऊन आली आहे. धनश्री काडगावकर आणि दुर्वेश देशमुख यांच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे. या दोघांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहुल लागली आहे. ही गोड बातमी दोघांनी एका अनोख्या पद्धतीने शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनश्री आणि दुर्वेशने एका खास व्हिडिओतून आपण "आई-बाबा'' होणार असल्याचं अनाऊन्स केलं आहे. दुर्वेशच्या वाढदिवसादिवशी ही गोड बातमी या दोघांनी साऱ्यांना दिली आहे. बाळाच्या आगमनाची चाहुल लागल्यावर स्त्रीच्या आयुष्यात जे बदल होतात. ते बदल, तो आनंद या व्हिडिओतून शेअर केलं आहे. 



धनश्रीने ही गोड बातमी सांगितल्यानंतर साऱ्यांनीच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रत्येक कलाकाराने तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिला आहे. धनश्री शेअर केलेला हा व्हिडिओ खूप खास आहे. अशा पद्धतीने पहिल्यांदा कुणी आपली गोड बातमी शेअर केली आहे. 


कोरोनाच्या काळात योग्य ती खबरदारी घेत हा व्हिडिओ तयार केल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडिओकरता मोजक्या लोकांची उपस्थिती होती. महत्वाची गोष्ट म्हणजे मेकअप करता आलेल्यांपासून ते अगदी कॅमेरामनपर्यंत साऱ्यांची Covid-19 चाचणी करण्यात आली होती.