मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) यांची Love Story. धनुष-ऐश्वर्याच्या लग्नाचे (Dhanush And Aishwarya Marriage) किस्से तुम्ही बऱ्याचवेळा ऐकले असतील. पण, आज या जोडप्याच्या लग्नाच्या 18 वर्षे झाली आहेत. त्यांची भेट कशी झाली आणि प्रेम कसं फुललं हे आज आपण जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनुष आणि ऐश्वर्याच्या पहिल्या भेटीची कहाणी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. ऐश्वर्या आणि धनुष यांची भेट एका शोदरम्यान झाली होती. एका मुलाखतीत धनुषनं त्याच्या प्रेमकथेबद्दल खुलासा केला आहे. धनुषनं सांगितलं की, हा त्याच्या 'काढाल कोंडे' या चित्रपटाचा पहिला शो होता. तो संपूर्ण कुटूंबासह हा शो पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेला होता. याच शोमध्ये रजनीकांत यांच्या मुली ऐश्वर्या आणि सौंदर्या देखील उपस्थित होत्या. चित्रपट संपल्यानंतर थिएटर मालकाने धनुषची रजनीकांतच्या दोन मुलींशी ओळख करून दिली. ते एकमेकांना हॅलो-हाय म्हणाले आणि निघून गेले.



रजनीकांत यांना त्यांच्या मुलीबाबत अशी कोणतीही बातमी मीडियामध्ये दाखवायची नव्हती. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी घाईघाईने धनुष आणि ऐश्वर्याच्या लग्नाची घोषणा केली. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर धनुष आणि ऐश्वर्याने लग्न केले. या जोडप्याला दोन मुले आहेत. एका मुलाचे नाव यात्रा, तर दुसऱ्या मुलाचे नाव लिंगा आहे. (Dhanush And Aishwarya Rajinikanth Marriage Anniversary Know About Their Love Story How It Started)