मुंबई : साऊथ स्टार धनुष (Dhanush)काही काळापूर्वी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही काळापूर्वी त्याने पत्नी ऐश्वर्याला (Rajinikanth daughter aishwarya) घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. ऐश्वर्या आणि धनुष या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली होती. त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला. आता बातम्या येत आहेत की धनुष आणि ऐश्वर्याला त्यांच्या नात्याला आणखी एक संधी द्यायची आहे. दोघांच्या कुटुंबीयांनी दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. (Dhanush and Rajinikanth daughter)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकत्र आपण उपाय शोधू
रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि तिचा पती धनुष यांनी जानेवारीमध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. आता बातम्या येत आहेत की, दोघांनाही या कल्पनेला आणखी थोडा वेळ द्यायचा आहे. Tollywood.net च्या रिपोर्टनुसार, दोघंही घटस्फोटाची प्रक्रिया थांबवत आहेत. दोघंही आपलं वैयक्तिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील.


धनुष आणि ऐश्वर्याच्या कुटुंबीयांनी रजनीकांतच्या घरी बसून चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. याठिकाणी जे प्रश्न आहेत ते दोघं मिळून सोडवतील, असं ठरलं. वडीलधाऱ्यांचा आदर करून सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न दोघंही करतील. (Dhanush and Rajinikanth daughter Aishwarya will not separate the decision of divorce postponed for the honor of the family)


यामुळे दुरावा वाढला होता का?
या वर्षी जानेवारीमध्ये धनुष आणि ऐश्वर्याने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केली होती की, लग्नाच्या 18 वर्षानंतर दोघंही एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेत आहेत. त्याने लिहिलं की, जोडपे म्हणून वेगळे होऊन तो स्वत:ला एकल व्यक्ती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. धनुष कामात व्यस्त असल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. त्यामुळे त्याच्या आणि ऐश्वर्यामधील अंतर वाढलं होतं.