`कोलावरी डी`फेम धनुषच्या आवाजातलं आणखी एक गाणं...
धनुषच्या आवाजातलं आणखी एक गाणं...
मुंबई : अभिनेता धनुष हा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधील मोठा कलाकार आहे. धनुष त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातोच पण २०११मध्ये आलेल्या 'कोलावरी डी' या गाण्यानं त्याला एक नवी ओळख मिळवून दिली होती. हाच धनुष आता पुन्हा त्याच्या चाहत्यांसाठी एक नवं गाणं घेऊन आलाय. आगामी 'असुरन' या चित्रपटासाठी धुनषनं 'पोल्लाथाभूमि' या गाण्याला आपला आवाज दिलाय.
२०११ मध्ये आलेल्या 'कोलावरी डी' या गाण्यानं प्रेक्षकांना ताल धरायला लावला होता. दाक्षिणात्यचं नाही तर सबंध भारतात धनुषला प्रसिद्धी मिळाली होती. बॉलिवूडमध्ये या गाण्याने अनेकांना वेडं करून टाकलं... जो तो 'कोलावरी डी' त्यावेळी गात होते. धनुषला बॉलिवूडमधील दोन चित्रपटदेखील मिळाले... ‘रांझना’च्या यशानंतर धनुष आणि अमिताभ बच्चन चित्रपट ‘शमिताभ’ आला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाई करू शकला नाही. अभिनेता धनुष हा एक चांगला गायक आहे या गोष्टीचा खराखुरा खुलासा आता झाला आहे.
धनुषने वेत्रिमारन दिग्दर्शित एका तमिळ चित्रपटात एक शांतीप्रिय असं गाणं गायल आहे. अभिनेता - संगीतकार जेवी प्रकाशने ट्विटरवर खुलासा केला आहे. 'पोल्लाथाभूमि' या गाण्याला धनुष, केन करुनास आणि टी जे यांनी मिळून या गाण्याला आवाज दिला आहे.
या गीताचे बोल युगभारतीने लिहले आहे. धनुषने यावर ट्वीट केलं आहे करून लिहले आहे की, या गाण्याची रेकॉर्डिंग करतांना खूप जास्त मजा आली होती 'पोल्लाधवन', 'पाण्डेम कोल्लू' आणि 'वाडा चेन्नई' नंतर धनुष 'असुरन' या चित्रपटात धनुष चौथ्यांदा वेत्रिमारनसोबत काम करत आहे.
'असुरन' हा चित्रपट तामिळ उपन्यास 'वेक्कई' यावर आधारित आहे. या चित्रपटाची कथा पूमणि यांनी लिहिली आहे. या चित्रपटात धनुष दुहेरी भूमिकेत रूपेरी पद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे तमिळ चित्रपटात सृष्टीत मंजू वारियर पदार्पण करणार आहे.