Dhanush Telegu Movie Shoot :  दाक्षिणात्य चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून धनुषकडे पाहिले जाते. 'रांझणा' या हिंदी चित्रपटातून तो प्रसिद्धीझोतात आला. या हिंदी चित्रपटातून त्याने प्रेक्षकांवर छाप पाडली. सध्या धनुष हा 'कॅप्टन मिलर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. यानंतर आता धनुष हा 'डीएनएस' या तेलुगू चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. पण आता पोलिसांनी परवानगी नाकारल्याने या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंकविला या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, काही आठवड्यांपूर्वी डीएनएस या चित्रपटाचा मुहुर्त पार पडला होता. यानंतर या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली होती. या चित्रपटातील काही भागाचे शूटींग हे तिरुपतीमध्ये करण्यात येणार आहे. पण आता या परवानगी न मिळाल्याने या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे. 


मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी


धनुषच्या आगामी DNS या चित्रपटाची शूटींग तिरुपती डोंगराच्या पायथ्याशी होणार होते. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांच्या बससह इतर वाहनांची वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तसेच काही क्रू मेंबर्सला या चित्रपटाचे शूटींग गोविंदराजा स्वामी मंदिराच्या बाहेर करायचे होते. त्यामुळे त्यांनी तिथे येणाऱ्या श्रद्धाळूंना मंदिराच्या बाहेर जाण्यास सांगितले, असेही बोललं जात आहे. 



चित्रपटाच्या शूटींगला ब्रेक


या घडलेल्या प्रकारामुळे चित्रपटाच्या क्रूविरोधात तक्रारही करण्यात आली. यानंतर तिरुपती पोलिसांनी DNS या चित्रपटाच्या टीमला तिथे शूटींग करण्यासाठी परवानगी नाकारली. त्यामुळे या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले. त्यामुळे आता DNS  चित्रपटाचे शूटींग लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 


धनुष हा सध्या 'कॅप्टन मिलर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात त्याच्यासोबत अभिनेता शिव राजकुमार, संदीप किशन, प्रियांका अरुल मोहन, अदिती बालन हे कलाकार झळकत आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात चित्रपटागृहांमध्ये 104 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटासोबतच सध्या तो DNS या चित्रपटाचे शूटींग करत आहे. यात त्याच्यासोबत नागार्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर कम्मुला करत आहेत. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.