Dhanush Unknown Facts: धनुषला अभिनयात नाही, तर `या` गोष्टीत होता इंटरेस्ट
१८ वर्षांचं नातं संपवून धनुष आणि ऐश्वर्याने घेतला घटस्फोट
मुंबई : Dhanush And Aishwaryaa Divorce: धनुषने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून लग्नाच्या १८ वर्षानंतर तो पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून विभक्त होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला की, एवढं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण काय?
धनुषने साऊथ सिनेमांमध्ये जी प्रसिद्धी मिळवली, त्याचं नाव बॉलिवूडमध्येही तितकंच घेतलं जातं. धनुषने काही चित्रपटांमध्ये जे स्थान बॉलीवूडमध्ये निर्माण केले आहे ते क्वचितच इतर कोणत्याही साऊथ स्टारला मिळाले असेल.
'रांझना' या चित्रपटातील त्यांचे बोलके संवाद आजही लोकप्रिय आहेत. धनुष केवळ उत्स्फूर्तपणे काम करत नाही तर त्याच्या मोहिनीने चाहत्यांवर खोल छाप सोडतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, एक काळ असा होता जेव्हा धनुषला अभिनेता नाही तर काहीतरी वेगळे व्हायचे होते.
धनुषचे खरे नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. त्यांच्या वडिलांचे नाव कस्तुरी राजा आणि आईचे नाव विजयालक्ष्मी आहे. धनुषचे वडील आणि भाऊ चित्रपट निर्माते आहेत, पण त्यानंतरही त्याला चित्रपटात काम करण्याऐवजी काहीतरी वेगळे करायचे होते. असे म्हटले जाते की, धनुष त्याच्या वडिलांमुळेच फिल्मी दुनियेत आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनुष जेव्हा 16-17 वर्षांचा होता तेव्हा त्याचे स्वप्न अभिनेता बनण्याचे नाही तर मरीन इंजिनियर बनण्याचे होते.
जेव्हा त्याच्या वडिलांनी अभिनयाचा आग्रह धरला तेव्हा तो अभिनेता झाला. धनुषबद्दल असंही म्हटलं जातं की, तो फक्त दहावीपर्यंतच शिकला आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, तो 12वीच्या परीक्षेत नापास झाला, त्यानंतर त्याने अभ्यास केला नाही.
धनुषने 2004 मध्ये साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न केले होते. लग्नाच्या 18 वर्षानंतर या जोडप्याने (धनुष आणि ऐश्वर्या घटस्फोट) आता घटस्फोटाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.