Dharmaveer 2 Box Office Collection Day 1: `देवरा`शी टक्कर तरी पहिल्याच दिवशी `धर्मवीर 2`नं केली `इतक्या` कोटींची कमाई
Dharmaveer 2 Box Office Collection Day 1: `धर्मवीर 2` या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी
Dharmaveer 2 Box Office Collection Day 1: जेव्हा बॉबी देओलनं 'धर्मवीर 2' या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केलं आणि त्यानंतर बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला हजेरी लावली तेव्हा पासून सगळीकडे याचीच चर्चा होती. एकीकडे ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खाननं देवरा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात आता 'धर्मवीर 2' देखील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. तर आता सगळ्यांचे लक्ष हे वीकेंडकडे लागले आहे की त्यावेळी हा चित्रपट किती कमाई करणार.
खरंतर 2022 मध्ये प्रदर्शित झालेला 'धर्मवीर' या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच काळापासून प्रतीक्षा करत होते. हा चित्रपट एकनाथ शिंदे यांचे राजकारणातील गुरू आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत आहेत. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सैकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडांवरून हे समोर आलं आहे की या चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 1.92 कोटींची कमाई केली आहे. तर चित्रपटाचं बजेट हे 15 कोटींचं आहे. आता हा चित्रपट वीकेंडला किती कमाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खानचा देवरा हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यानं पहिल्याच दिवशी संपूर्ण भारतात 77 कोटींची कमाई केली. तर वर्ल्डवाइड या चित्रपटानं 100 कोटींता आकडा पार केला आहे.
आनंद दिघे यांच्या विषयी बोलायचे झाले तर ऑगस्ट 2001 मध्ये ठाण्यातील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. 'धर्मवीर 2' मध्ये त्यांचं आयुष्य आणि राजकारणातील त्यांच्या करिअर संबंधीत अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या.
हेही वाचा : 'त्याला नेमकं काय झालं?'; सुशांत शेलारचा 'तो' VIDEO पाहून चाहते चिंतीत
दरम्यान, 'धर्मवीर 2' विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर अवलंबून आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका ही अभिनेता प्रसाद ओकनं साकारली आहे. तर हा चित्रपट झी स्टुडियोज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत आहे.