'त्याला नेमकं काय झालं?'; सुशांत शेलारचा 'तो' VIDEO पाहून चाहते चिंतीत

Sushant Shelar Video Viral : सुशांत शेलारच्या त्या व्हिडीओला पाहून चाहते चिंतीत, नक्की काय झालं... 

दिक्षा पाटील | Updated: Sep 28, 2024, 12:34 PM IST
'त्याला नेमकं काय झालं?'; सुशांत शेलारचा 'तो' VIDEO पाहून चाहते चिंतीत title=
(Photo Credit : Social Media)

Sushant Shelar Video Viral : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकच्या 'धर्मवीर 2' ची सगळीकडे चर्चा सुरु आहे. काल हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी देखील त्याचा नुकताच ग्रँड प्रीमियर झाला. या ग्रँड प्रीमियरला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता सुशांत शेलारनं देखील हजेरी लावली होती आणि त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सुशांत शेलार आता इतका बारीक झाला आहे की सगळ्यांना प्रश्न पडला आहे की नक्की त्याला काय झालं आहे. 

सुशांतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सुशांत खूप बारीक झाला आहे. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांना त्याची 'दुनियादारी' या चित्रपटातील भूमिका आठवली. या चित्रपटातील त्याच्या हम सस्ती चीजोका शॉक नही रखते या डायलॉगनं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यावर कमेंट करत आहेत की त्याला नेमकं काय झालं आहे. काही नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं की त्याला ओळखणं कठीण झालं. तर काही नेटकऱ्यांनी म्हटलं की त्याला त्यांनी ओळखलंच नाही. एक नेटकरी म्हणाला, 'त्याला नेमकं काय झालं आहे?' त्याच्या तब्येत ठीक नव्हती का असं देखील अनेकांनी विचारलं आहे. तर काहींनी विचारलं की तो असा का दिसतोय... नेमकं त्याला काय झालं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : मराठमोळ्या 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाची ऑस्करसाठी निवड

सुशांतच्या चाहत्यांनी त्यावर अनेक कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'आजारी असल्या सारख दिसत आहे. दुनियादारी मधे मस्त होता.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'देशी चालू केली काय.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'येवढं बारीक अचानक.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'सुशांत ना हा. एवढा का बारीक झालास भावा तू. तर काही नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, दारू जास्त झाली.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'राऊत बनायला चाललाय वाटत.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'देशी चालू केली काय.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'दाजी आणि मेहुण्यानी‌ काय शपथ घेतली आहे का ? काडीसारखं बारीक व्हायचं म्हणून...' तिसरा नेटकरी म्हणाला, 'आई कुठे काय करते मालिकेमध्ये अनिरुद्धला रिप्लेस करा.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'कपडे घसरतील अंगावरून.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सुशांत शेलारच्या नावावर हाडांचा सापळा फिरतोय.'