Dharmaveer 2 Trailer 2 : 'जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा' अशी थेट आणि स्पष्ट गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारीत 'धर्मवीर' हा चित्रपट आपण पाहिला. आता त्याच चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच चित्रपटाचा आता दुसरा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे अंगावर अक्षरशः काटा येत आहे. नव्या ट्रेलरमधून दिघेसाहेबांची विविध रुपं दाखवण्यात आली आहेत. सर्वसामान्यांसाठी झटणारे, अन्याय रोखणारे, महिलांना न्याय मिळवून देणारे, धर्मासाठी लढणारे दिघेसाहेब या गाण्यात दिसतात. त्याशिवाय हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. त्यामुळे हिंदुत्त्वाविषयी थेट आणि आक्रमक भूमिका घेणारे साहेबयात दिसतात. म्हणूनच आता चित्रपटात काय कथानक उलगडणार याच कुतुहल सगळ्यांना निर्माण झाले आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

चित्रपटाच्या या पूर्वी प्रदर्शित केलेल्या टीजर, ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाची गाणीही गाजत आहेत. त्यातील असा हा धर्मवीर हे गाणं चांगलंच गाजतयं. विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या या गाण्याला मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अविनाश - विश्वजीत या जोडगोळीने या गाण्याला संगीत दिले असून सुप्रसिद्ध बॉलिवुड गायक सुखविंदर सिंग यांच्या दमदार आवाजात हे गाण रेकॉर्ड करण्यात आले आहे. सगळ्या चाहत्यांना आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर पाहून खूप जास्त उत्सुकता वाढली आहे. 


त्यानंतर आता आणखी एक नवा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. संगीतकार चिनार महेश आणि अविनाश विश्वजित यांनी 'धर्मवीर 2' मधील  गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. 


हेही वाचा : ब्रेस्ट कॅन्सरमध्ये Mucositis ची शिकार झाली Hina Khan! वेदनेला कंटाळून पोस्ट शेअर करत म्हणाली...


'धर्मवीर 2' या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे उमेश कुमार बन्सल आणि मंगेश देसाई यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. अभिनेता प्रसाद ओक, क्षितीश दाते यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.