Dharmendra changed his Name : बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर धर्मेंद्र या नावानं सगळ्यांच्या मनात एक छाप सोडली. पण सध्या धर्मेंद्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे वयाच्या 88 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी त्यांचं नाव बदललं आहे. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ही गोष्ट समोर आली आहे. हा चित्रपट काल चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनन मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. या चित्रपटात धर्मेंद्र यांनी शाहिदच्या आजोबांची भूमिका साकारली आहे. चित्रपटात त्यांना दादा (आजोबा) असंच म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाच्या सुरुवातीला जेव्हा सगळ्या कलाकारांना क्रेडिट देण्यात आले. त्यात एक गोष्ट कळली की जन्माच्या वेळी देण्यात आलेलं नाव आता धर्मेंद्र यांनी ते नाव आता त्यांनी प्रोफेशन्ली वापरण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या क्रेडिट प्लेटवर धर्मेंद्र यांचं नाव धर्मेंद्र सिंह देओल दाखवण्यात आलं. धर्मेंद्र यांनी त्यांच्या नावात असलेला हा बदल वयाच्या 88 व्या वर्षी आणि चित्रपटसृष्टीत 64 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केला आहे. 'हिंदुस्तान टाइम्स' नं दिलेल्या वृत्तानुसार, धर्मेंद्र यांचं नाव धर्म सिंह देओल असं होतं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


धर्मेंद्र यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किशन सिंह देओल आणि आईचे नाव सतवंत कौर आहे. 'इंडियन एक्सप्रेस' च्या रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांचे वडील हे मुख्याध्यापक होते. तर त्यांची आई गृहीनी होत्या. मुंबईत येऊन अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी धर्मेंद्र हे पंजाबच्या साहनेवाल गावात लहानाचे मोठे झाले. जेव्हा त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, तेव्हा धर्मेंद्र यांनी त्यांचं मधलं नाव आणि आडनाव काढून टाकलं. तर त्यांची मुलं म्हणजे सनी देओल आणि बॉबी देओल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्यांनी त्याचं आडनाव ठेवण्याचा निर्णय घेतला. 


हेही वाचा : लग्नानंतर वर्षभरात झाले विभक्त, सोशल मीडियावरून काढले नवऱ्याचे फोटो आणि आडनाव? अभिनेत्रीनं केला खुलासा


धर्मेंद्र यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाआधी ते करण जौहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात देखील धर्मेंद्र यांनी आजोबाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांच्या किसींग सीननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी शबाना आजमी यांच्यासोबत लिपलॉकचा सीन दिला होता.