मुंबई : माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि भाजपचे दिग्गज नेते यांनी वयाच्या ६६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बॉलिवूडच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेता अनिल कपूर, त्याचप्रमाणे अजय देवगन यांच्या शिवाय अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सुद्धा त्यांचे दु:ख व्यक्त केले आहे. अरूण जेटलींना आपला छोटा भाऊ सांगत धर्मेंद्र यांनी भवनात्मक ट्विट शेअर केले आहे. त्याचप्रमाणे दोघांचा एक फोटो सुद्धा शेअर केला आहे.   


फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'एक जवळचा मित्र, अत्यंत काळजी घेणारा छोटा बंधू, माझ्यासाठी ते राजकारणातील सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक होते. तुमची खुप आठवण येईल.' असे लिहिले आहे. 


भाजपमधील संयमी आणि बुद्धिमान नेता, उत्कृष्ट संसदपटू आणि सर्वपक्षीय संबंध असणारा नेता म्हणून जेटली यांची ओळख होती. दिल्लीतील उच्चभ्रू वर्तुळात जेटलींना विशेष मान होता. २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. २००९ मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी कामही पाहिले होते.