Dharmendra Ate Isabgol : बॉलिवूडचे ही-मॅन अशी ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. धर्मेंद्र हे 87 वर्षांचे असले तरी देखील ते आजही अभिनय करताना दिसतात. धर्मेंद्र यांना मिळालेली लोकप्रियता तर सगळ्यांनाच माहित आहे. मात्र, कोणाला त्यांनी केलेला संघर्ष माहित आहे का? धर्मेंद्र यांना अभिनय क्षेत्रात येणं खूप कठीण होतं. धर्मेंद्र यांच्यावर अशी एक वेळ आली होती की त्यांच्यांकजे जेवायलाही पैसे नव्हते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मेंद्र यांनी अभिनय क्षेत्रात आल्यानंतर सुरुवातीला आलेल्या त्यांच्या संघर्षाविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. मला मुंबईत यायचं होतं, पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. घरातून कसेबसे मुंबई गाठले आणि मग जीवनाचा संघर्ष सुरू झाला. मला फक्त अभिनेता व्हायचे होते कारण मला मोठ्या पडद्यावर हीरोला पाहायला खूप आवडायचे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यावेळी त्यांनी एक घटना सांगत म्हणाले, जेव्हा त्यांच्याकडे जेवणासाठी पैसे नव्हते तेव्हा त्यांनी पोट भरण्यासाठी संपूर्ण इसबगोल खाल्लं होतं. धर्मेंद्र म्हणाले, त्यांना एकदा ते कामाच्या शोधात बाहेर गेले होते. तेव्हा त्यांच्या खिशात एक रुपयाही नव्हता. तेव्हाच त्यांना खूप भूक लागली होती. ते जेव्हा रूमवर आले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या जवळचं मित्राचं इसबगोलचं पॅकेट होतं. त्यात नक्की काय आहे किंवा ते कशासाठी आहे हे न पाहता त्यांनी ते पॅकेट पूर्ण संपवलं. त्यानंतर त्यांना खूप त्रास झाला होता. 


हेही वाचा : Ankita Lokhande Pregnant : अंकिता लोखंडेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, म्हणाली 'मी खूप आनंदी...'


दरम्यान, इसबगोल खाल्ल्यानंतर धर्मेंद्र यांची इतकी परिस्थिती बघडली की त्यांचे मित्र त्यांना लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना औषध देण्यास नकार दिला आणि म्हणाले त्यांना औषधांची नाही जेवण करण्याची गरज आहे. 


1960 मध्ये धर्मेंद्र यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी धर्मेंद्र हे फक्त 25 वर्षांचे होते. धर्मेंद्र यांनी त्यावेळी अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले. धर्मेंद्र यांनी नुकतीच 'ताज-डिव्हाइड बाय ब्लड' या वेबसीरिजचा पहिल्या लूक शेअर केला आहे. या वेबसीरिजमध्ये धर्मेंद्र हे सुफी संत शेख सलीम चिश्ती यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या फर्स्ट लूकमध्ये धर्मेंद्र यांना ओळखणेही कठीण होत आहे