Dharmendra on his kissing Scene : लोकप्रिय दिग्गज अभिनेता धर्मेंद्र हे त्यांच्या आणि शबाना आझमी यांच्या किसमुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. त्या दोघांना 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाला मिळालेलं यश पाहता टीमनं एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत रणवीरनं धर्मेंद्र आणि शबाना यांच्या लिपलॉकवर मस्करी केली हे पाहता धर्मेंद्र यांनी जे उत्तर दिलं त्यांनं तिथे उपस्थित असलेले सगळेच आश्चर्य चकित झाले आणि इतकंच नाही तर सगळ्यांना हसू अनावर झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मेद्र आणि शबाना आझमी यांच्यातील किसिंग सीननं अनेकांचे लक्ष वेधले. इतकंच नाही तर त्यामुळे हा चित्रपट चर्चेत देखील आला होता. हे पाहता त्याच्यावरच त्यांना प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. रणवीर सिंग या प्रेस कॉन्फरन्समध्ये धर्मेंद्र यांची थट्टा करत म्हणाला की 'धरम जी तुम्ही हॉलमध्ये फक्त त्या सीनवर प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहायला जायला हवं.'  त्यावर उत्तर देत धर्मेंद्र म्हणाले की 'अनपेक्षितपणे, मी प्रिमीयरला पोहोचू शकलो नाही. पण मला अनेकांचे मेसेज आले. मी त्यांना म्हणालो, हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. (ये तो मेरे दाएं हाथ का खेल है)'. त्यावर प्रेक्षकांनी ओरडून ओह्ह ओह्ह अशा प्रतिक्रिया दिल्या. त्यावर आलिया आणि रणवीर खूप हसू लागले. पुढे धर्मेंद्र म्हणाले, 'बाएं हाथ से करवाना है, वो भी करवालो।' (डाव्या हाथानं करवून घ्यायचं आहे, ते पण करून घ्या)



पुढे धर्मेंद्र म्हणाले कॅप्टनने सब कुछ बता दिया था। कॅप्टन अच्छा हो तो टीम खूब खेलती है। करण कहता है 5 साल बाद आया हूं, लेकिन अब आया है तो अपना जौहर दिखा के जाएगा। मैंने जब पहली कहानी सुनी... मैंने बुरी कहानियों में भी काम किया है, कभी पैसे के लिए, कभी किसी की मदद करने के लिए, मगर जिस दिन ये कहानी सुनी मैंने, मुझे लगा ये घर घर की कहानी है.' (कॅप्टननं सगळ आधीच सांगितलं होतं. कॅप्टन चांगला असेल तर टीम खूप छान खेळते. करण म्हणतो की मी 5 वर्षांनी आलो आहे, पण आता आलोच आहे तर माझा जोहर दाखवून जाईन. मी जेव्हा पहिल्यांदा पटकथा ऐकली... मी वाईट पटकथांसाठी काम केलंय, कधी पैशांसाठी, कधी कोणाची मदत करण्यासाठी पण ज्या दिवशी ही पटकता ऐकली तेव्हा मला असं वाटलं की प्रत्येक घरातली कहानी आहे.)



हेही वाचा : मी आईसाठी अंडरगार्मेंट्स खरेदी करतो हे जेव्हा मित्रांना कळलं..! करण जोहरचा मोठा खुलासा


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्याचे दिग्दर्शन करण जोहरनं केलं आहे.