इशाच्या लग्नात भावांची हजेरी का नाही? पत्रकाराच्या प्रश्नावर संतापले Dharmendra
Dharmendra : धर्मेंद्र यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये धर्मेंद्र यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत इशा, हेमा आणि अहानाची माफी मागितली. दरम्यान, त्यांच्या या पोस्टमुळे देओल कुटुंबात काही ठीक नाही अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
Dharmendra : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याचं कारण हे सगळ्यात आधी त्यांता नातू करण देओलचं लग्न आणि त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक भावूक पोस्ट. धर्मेंद्र यांनी काल दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि लेक इशा आणि आहानासाठी एक भावूक पोस्ट शेअर केली. त्याच कारण करण देओलचं लग्न असू शकतं असं अनेकांना वाटतं. कारण करण देओलच्या लग्नात त्या तिघी दिसल्या नाहीत. याच कारणामुळे धर्मेंद्र यांनी ही पोस्ट शेअर केली होती, अशा चर्चा आहेत. त्यानंतर इशानं त्यानंतर पोस्ट शेअर करत त्यावर वडील धर्मेंद्र यांच्यासाठी एक भावूक पोस्ट शेअर केली होती. इतकं होऊन देओल कुटुंबात सगळं काही ठीक नाही अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. सोशल मीडियावर धर्मेंद्र यांचा एका मुलाखतीतील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
धर्मेंद्र यांचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इशा देओल यांच्या लग्नातील आहे. तिच्या लग्नात पत्रकारांनी धर्मेंद्र यांना प्रश्न विचारला की बहिणीच्या लग्नात तिचे मोठे कुठे आहेत? हा प्रश्न ऐकताच धर्मेंद्र यांचा राग अनावर होतो आणि ते पत्रकारांना म्हणतात की "तुम्ही काहीही बडबडू नका". त्यांचा हा जुना व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचं कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर धर्मेंद्र आणि इशा यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे.
हेही वाचा : 3 Idiots च्या सिक्वेल येतोय? देवभोळा 'राजू' साकारणाऱ्या शरमन जोशीचा मोठा खुलासा
धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झाले होते. 1954 साली धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्यासोबत सप्तपदी घेतल्या होत्या. त्यानंतर धर्मेंद्र हे बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर 1980 साली त्या दोघांनी विवाह केला. हेमा यांच्याशी लग्न करण्याआधीच धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना चार मुलं होतं. लग्नाच्या वर्षभरात म्हणजेच 1981 साली हेमा यांनी इशाला जन्म दिला आणि त्यानंतर 1985 साली हेमा यांनी अहानाला जन्म दिला.
पोस्टमध्ये काय म्हणाले होते धर्मेंद्र?
"ईशा, अहाना, हेमा आणि माझी सगळी मुलं... तख्तानी कुटुंब आणि वोहरा कुटुंबावर माझं खूप प्रेम आहे आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आदर करतो... माझं वय आणि आजार मला सांगत आहेत की मी तुमच्यासाठी पर्सनली बोलू शकत होतो... पण..." असे धर्मेंद्र त्या पोस्टमध्ये म्हणाले होते.
दरम्यान, यंदाच्या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सनी देओलचा 'गदर 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट अक्षय कुमारच्या OMG 2 सोबत प्रदर्शित होणार आहे.