Dharmendra on Deol Family : बॉलिवूड अभिनेता सनी देओल ही त्यांच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा पार केला आहे. तर दुसरीकडे त्यांचा मुलगा सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हे पाहता आता धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टीची दुसरी बाजू सांगितली आहे. ज्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. धर्मेंद्र यावेळी म्हणाले की त्यांच्या कुटुंबानं त्याचं मार्केट केलं नाही आणि इतकंच काय तर त्यांनी केलेल्या कामाची चित्रपटसृष्टीत कोणी स्तुती देखील केली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याविषयी बोलताना धर्मेंद्र म्हणाले की 'देओल कुटुंबानं चित्रपटसष्टीत इतकं काम केलं. पण कोणीही देओल कुटुंबाचं कौतुक केलं नाही. चित्रपटसष्टीत त्यांच्या योगदानाची कोणी दखल घेतली नाही. देओल कुटुंब कोणत्याही प्रकारच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीवर लक्ष देत नाही. आमचं काम आमच्यासाठी सर्वकाही आहे. यावर आमचा विश्वास आहे.' 



पुढे धर्मेंद्र हे त्यांचा मुलगा सनी देओलविषयी बोलताना म्हणाले की 'माझा मुलगा सनी देओलनं चित्रपटसृष्टीला दोन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्याबद्दल तो कधीच काही बोलला नाही. चित्रपटसृष्टीत त्यानं अप्रतिम काम केलं आहे. माझा लहान मुलगा बॉबी देओलनं देखील चित्रपटसृष्टीत उत्तम काम केलं आहे. पण माझ्या कुटुंबाचं कधीही कौतुक झालं नाही. तर या गोष्टीचं आम्हाला कधी वाईट वाटलं नाही.'


धर्मेंद्र इथेच थांबले नाही तर भावूक होत पुढे चाहत्यांविषयी म्हणाले की ‘चाहत्यांचं आमच्यावर असलेलं प्रेम आमच्यासाठी सगलं काही आहे. चाहत्यांचं प्रेम आम्हाला मिळत राहो यासाठी आम्ही उत्तम काम करण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटसृष्टीतून होत असलेल्या कौतुकाची आम्हाला गरज नाही...' 


हेही वाचा : 'फुफ्फुस 80 ते 85 टक्के निकामी, गंभीर आजार आणि...', विद्याधर जोशी यांना झालंय तरी काय?


धर्मेंद्र हे रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामुळे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनी केलेल्या अभिनयाची सर्वत्र चर्चा सुरु होती. पण सगळ्यात जास्त चर्चा ही त्यांच्या आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची होती. त्यांचा हा सीन सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता. धर्मेंद्र यांना जेव्हा या विषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की मी असं ऐकलं की शबाना आणि माझ्यात असलेल्या किसिंग सीननं प्रेक्षकांना आश्चर्य झालं. प्रेक्षकांना त्याची अपेक्षा नव्हती आणि अचानक त्यांना हे स्क्रिनवर पाहायला मिळाले. या आधी सगळ्यात शेवटी मी जो किसिंग सीन दिला होता तो लाइफ इन ओ मेट्रोमध्ये दिला होता.