Vidyadhar Joshi : मराठी मनोरंजनसृष्टीचे लाडके ‘बाप्पा’ म्हणजेच अभिनेते विद्याधर जोशी यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी सांगितलं आहे. त्यांच्या आयुष्यातील गेले आठ ते दहा महिने हे संघर्षमय होते. सगळं सुंदर सुरु असताना अचानक त्यांना गंभीर आजार झाला आणि त्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्यात उलटा पालट झाली. त्याविषयी विद्याधर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काही गोष्ट सांगितल्या आहेत.
विद्याधर यांनी नुकतीच 'मुंबई टाईम्स'ला मुलाखत दिली होती. यावेळी मुलाखतीत विद्याधर जोशी यांनी त्यांच्या या कठीण काळाविषयी सांगितलं आहे. यात त्यांनी त्यांचा हा त्रासदायक प्रवास सांगितला आहे. याची सुरुवात कोरोनाच्या काळात झाली. त्यावेळी विद्याधर हे ‘ते माझा होशील ना’ या मालिकेत दिसत होते. सुरुवातीला त्यांना कोरोना झाला, पण औषधोपचारानं ते त्यातून बरे देखील झाले होते. मात्र, काही दिवसांनी त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला. पण तेव्हा त्यांना जो ताप आला होता तो कोरोनामुळे नव्हता. त्याचं वेगळंच कारण असल्याचं नंतर समोर आलं. ताप कमीच होत नव्हता हे पाहता त्यांनी सिटीस्कॅन केला. तेव्हा त्यातून समजलं की त्यांच्या 'फुफ्फुसांचा फायब्रॉसिस' आजार झाला आहे. त्यानंतर आणखी काही चाचण्या केल्या त्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्यांचं फुप्फुस हे 13 टक्के निकामी झालं आहे.
हेही वाचा : KBC च्या सेटवर बिग बी मद्यधुंद अवस्थेत आले, अभिषेकनं त्यांना पाहिलं आणि...
त्यात त्यांना बरा न होणारा ‘आयएलडी-इन्टरस्टिशिअल लंग्ज डिसीज’ झाल्याचं कळलं. त्यावर औषधं उपलब्ध नाहीत. फक्त तो वेगानं वाढू नये म्हणून औषध दिलं जाऊ शकतं. पण त्याचीही खात्री नाही, ही सगळी माहिती विद्याधर यांना मिळाली. तरी देखील ते मालिका, सिनेमांचं चित्रीकरण करत होते. ‘जिवाची होतिया काहिली’ या मालिकेत काम करत असताना त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. त्यांचा आजार वेगाने वाढत होता. गेल्या डिसेंबर ते जानेवारी महिन्यात हा आजार एवढा वाढला की त्यांची दोन्ही फुफ्फुसं 80 ते 85 टक्के निकामी झाली. यावर ‘फुफ्फुस प्रत्यारोपण’ (म्हणजेच लंग्ज ट्रान्सप्लांट) हा एकमेव पर्याय शिल्लक होता. पण तो बराच खर्चिक होता. पण हाच पर्याय त्यांनी निवडला आणि 12 जानेवारी 2023 ला मुंबईत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.