मुंबई : बॉलिवूड किड्सना चित्रपटांमध्ये अगदी सहजरित्या एन्ट्री मिळते. परंतु कला क्षेत्रात आपलं वर्चस्व निर्माण करणं त्यांच्यासाठी फार कठीण असतं. त्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. या मेहनतीचं फळ काहीच्या नशिबात लवकर येत तर काहींना या फळासाठी खूप वाट पाहावी लागते. असंत काही घडलं ते म्हणजे अभिनेते धर्मेंद्र आणि पत्नी हेमा मालिनी यांनी कन्या अभिनेत्री ईशा देओल सोबत. ईशाने बॉलिवूड अनेक चित्रपटं दिली पण ते चित्रपटं चाहत्यांचे मनोरंजन करण्यास अपयशी ठरले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपलं आवडतीचं काम करण्यासाठी घरच्यांचा पाठिंबा फार महत्त्वाचा असतो. परंतु इशाला तिच्या वडिलांचा पाठिंबा कधीही मिळाला नाही. तब्बल १७ वर्षांनंतर धर्मेंद्रने असं काही केलं की इशा भावूक झाली. 


लग्नानंतर ईशाने पुन्हा आपला मोर्चा अभिनय क्षेत्राकडे वळवला आहे. 'केकवॉक' लघुपटाच्या माध्यामातून ती कलाक्षेत्रात पुन्हा पदार्पण करत आहे. या चित्रपटामुळे तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. MTVIWMBUZZ डिजिटल अवॉर्ड अण्ड सोसायटी आयकॉनचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार तिला मिळाला आहे.


आपल्या या यशावर ती फार खुश आहे. ईशाने चित्रपटांमध्ये काम करण्याच्या विरोधात धर्मेंद्र होते. यासंबंधतीत खुलासा हेमा मालिनी लिखीत 'बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या पुस्तकात करण्यात आला आहे. ईशाने चित्रपटात भूमिका साकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर धर्मेंद्र तिच्यासोबत ६ महिने बोलले नव्हते. 


२००२ साली प्रददर्शित झालेल्या 'कोई मेरे दिल से पुछे' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. तर आता तब्बल १७ वर्षांनंतर ती पुन्हा बॉलिवूडमध्ये आपल्या अदा दाखवण्यासाठी सज्ज होणार आहे.