मथुरा : भाजपाच्या उमेदवार अभिनत्री हेमा मालिनी आणि पति अभिनेते धर्मेंद्र रविवारी मथुरामध्ये प्रचार करणार आहेत. हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र प्रचारसभेत सामिल होणार आहेत. तीन विधानसभा क्षेत्रांतील मतदारसंघात ते सभा घेणार आहेत. तसेच सोमवारी गृहमंत्री राजनाथ सिंहदेखील मथुरामधील चैमुहांमधील एका सभेला संबोधित करणार आहेत. माजी खासदार आणि चित्रपट विश्वातील 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे अभिनेता धर्मेंद्र पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्व सभांना संबोधित करण्यासाठी मथुरा येथे दाखल होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी तीन वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रांतील मतदारसंघात एक-एक प्रचारसभेला ते संबोधित करणार आहेत. पहिली सभा गोवर्धन क्षेत्रातील खुंटेल पट्टी या भागात होणार आहे. धर्मेंद्र दुसरी प्रचारसभा बलदेव विधानसभा भागात घेणार आहेत. या भागात प्रचारसभेसहीत ते रोड शोदेखील करण्याची शक्यता आहे. याशिवाय मांट विधानसभा भागातही ते एक प्रचारसभा घेणार आहेत. सोमवारी गृहमंत्री राजनाथ सिंहदेखील मथुरामधील छाता विधानसभा क्षेत्रातील चैमुहा कस्बे या भागात एका प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. 


याआधी धर्मेंद्र यांनी एका ऑडिओ क्लिपद्वारे मथुरातील लोकांना पत्नी हेमा मालिनीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले होते. ही ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. २ मिनिटे ५१ सेकेंद असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आपल्या चित्रपटांच्या नावाच्या माध्यमातून मथुरातील जनतेला हेमा मालिनी यांना निवडून आणण्यासाठी आवाहन केले होते. ऑडिओ क्लिपच्या सुरूवातीलाच त्यांनी 'गिरिराज महाराज की जय हो' आणि 'राधे राधे' अशा घोषणेसह लोकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल ऋणी असल्याचे धर्मेंद्र यांनी ऑडिओ किल्पमधून म्हटले होते.