मुंबई : बिग बॉसच्या घरात सध्या चांगलाच ड्रामा रंगत आहे. या वेळी बिग बॉसच्या घरातले स्पर्धकही खूप वेगळे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसच्या घरात धिंचाक पूजाला संधी मिळाली होती. पण कमी वोटमुले तिला लवकर घरातून बाहेर पडावं लागलं. बिग बॉसमुळे तिचं नशीब उघडलं आहे. 


एका अहवालानुसार पूजाला एका मोठ्या कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळाली आहे. पूजा कलर्सवरील आगामी शोमध्ये दिसू शकते. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 


हा शो कॉमेडीवर आधारित असेल. ज्यामध्ये एकमेकांची चांगलीच चेष्टा उडवली जाणार आहे. याव्यतिरिक्त या शोमध्ये दीपिका कक्कर, आदित्य नारायण, रवी दुबे आणि मौनी रॉय यांच्यासारखे तारे दिसतील.