प्रेग्नेंसी दरम्यान Dia Mirza कशी काळजी घेतेय पाहा, तिचे हे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
गरोदरपणात दिया स्वतःची विशेष काळजी घेताना दिसत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) गरोदर असून ती लवकरच पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. गरोदरपणात ती स्वतःची विशेष काळजी घेताना दिसत आहे. दिया रूपेरी पडद्यापासून दूर असली तरी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांना सांगत असते. आता देखील तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती व्यायाम आणि योगा करताना दिसत आहे. दियाचा हा फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होचत आहे.
प्रेग्नेसीची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. एक फोटो शेअर तिने कॅप्शनमध्ये 'सौभाग्य मिळालं आहे. धरती मातेसोबत एक होण्याचं.... जीवनातील शक्तींमध्ये एक होण्याचं.... अनेक गोष्टी, अंगाई आणि गाण्यासोबत एक होण्याचं.... अनेक आशांसोबत एक होण्याचं.... सौभाग्य मिळालं आहे ... गर्भात असेलल्या एक बाळाला सांभाळण्यात धन्यता मिळण्याचा... ' असं लिहिलं आहे.
लग्नाआधी ही गुजन्यूज का शेअर केली नाही असे प्रश्न दियाला पोस्टनंतर विचारण्यात आले. दियाने नेटकऱ्यांच्या या प्रश्नाला संयमाने उत्तर दिले. ती म्हणाली, 'बाळ होणार आहे,म्हणून आम्ही लग्न केलं नाही. आम्हाला एकत्र राहायचं आहे म्हणून आम्ही लग्न केलं. आम्ही लग्नाची तयारी करत होतो तेव्हा आम्हाला गुडन्यूज कळाली. '
दरम्यान दिया आणि पती वैभव हनीमूनसाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत वैभवच्या पहिल्या पत्नीची मुलगी समैरा देखील त्यांच्यासोवत होती. 15 फेब्रुवारीला दिया व्यावसायिक वैभव रेखी याच्यासह सात जन्मांसाठी एकमेकांची साथ देण्याचं वचनत देत लग्नगाठ बांधली.