Dia Mirza weds Vaibhav Rekhi : लग्नबंधनात अडकली दिया मिर्झा
पहा दियाचा ब्रायडल लूक
मुंबई : दिया मिर्झा (Dia Mirza)च्या घरी लगीनघाई बघायला मिळाली. वैभव रेखी (Vaibhav Rekhi) सोबत दिया लग्नबंधनात अडकली आहे. लग्नाचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. तसेच व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दियाने स्वतः मीडियासमोर येऊन माहिती दिली. बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा घटस्फोटानंतर पुन्हा विवाह बंधनात अडकणार आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये दियाने उद्योगपती साहिल संघा बरोबर लग्न केलं.
असा होता ब्रायडल लूक
दियाचा ब्रायडल लूक समोर आला आहे. दिया आपल्या या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. दिया लाल रंगाच्या जोड्यात दिसत आहे. लाल रंगाची जरी वर्कची साडी नेसली आहे. तसेच तिने लाल रंगाची ओढणी घेतली आहे. यासोबतच दियाने कॉन्ट्रास्ट ज्वेलरी कॅरी केली आहे. अतिशय थोड्या ज्वेलरीत दिया अतिशय सुंदर दिसत आहे.
वैभव रेखी या बिझनेसमन मित्रासोबत दिया मिर्झा विवाह बंधनात अडकली आहे. निवडक मित्र परिवार आणि कुटुंबाच्या उपस्थितीत हा विवाह पार पडणार आहे. ते दोघे गेल्या वर्षीपासून ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे.
दियाचा ब्रायडल लूक अतिशय व्हायरल होत आहे. RHTDM मधील दियाचा ब्रायडल लूक आणि आता तिच्या रिअल लाईफ ब्रायडल लूकची तुलना होताना दिसते.