काय म्हणता....? कतरिना- विकीच्या लग्नात Ex Boyfriend रणबीरची हजेरी; व्हायरल फोटोमुळे पोलखोल
पाहिला का, फोटो
मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी अतिशय थाटामाटात आणि शाही अंदाजाच 9 डिसेंबरला लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील एका अतिशय सुरेख ठिकाणी त्यांच्या लग्नाचा थाट पाहायला मिळाला. चाहत्यांपासून या लग्नाची प्रत्येक गोष्ट फार गोपनीय ठेवण्यात आली. पण, त्यानंतर मात्र उत्सुकता पाहता खुद्द विकी आणि कॅटनंच त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
आता या बहुचर्चित जोडीच्या लग्नातील एक असा फोटो समोर आला आहे, जो सर्वांनाच पेचात पाडत आहे. हा फोटो आहे कतरिनाच्या मेहंदी सोहळ्यातील. ज्यावेळी विकीच्या नावाची मेहंदी कॅटच्या हाती लागलेली असतानाच विवाहस्थळी एकच कल्ला झाला.
विकी आणि कतरिनानंही त्यावेळी मोठ्या उत्साहात ठेका धरला. हे क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपले गेले आणि पाहता पाहता त्याच क्षणाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले.
आता इथं महत्त्वाची गोष्ट अशी, की सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल झाले, त्यामध्ये कॅट आणि विकी तर धमाल करताना दिसलेच. पण, आणखी एक बाब अशी की या फोटोमध्ये तिथे मागे रणबीरही उभा असल्याचं दिसला.
कतरिना आणि विकीकडे तो एकटक पाहताना दिसत होता. आता प्रश्न असा, की रणबीर खरंच कतरिनाच्या लग्नाला गेला होता का?
तर, तसं नाहीये. रणबीर म्हणा किंवा सलमान म्हणा. यांपैकी कोणीही कॅटच्या लग्नासाठी गेले नव्हते. सोशल मीडियावर समोर येणारे त्यांचे फोटो मॉर्फ केलेल आहेत. जे काही फॅन पेज आणि मीम पेजेसवर शेअर करण्यात आले आहेत.
फोटो कसेही असो, त्यांची चर्चा मात्र जबरदस्त सुरु आहे हे काही नाकारता येणार नाही.