चेहऱ्याची सर्जरी करणं सुष्मिता सेनला पडलं महागात? अभिनेत्रीला ओळखणंही कठीण
आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांना भुरळ घालणारी अभिनेत्री सुष्मिता सेन कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी सुष्मिता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आणि यामगचं कारण आहे ते म्हणजे, अभिनेत्रीचा बदलेला लूक.
मुंबई : आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांना भुरळ घालणारी अभिनेत्री सुष्मिता सेन कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी आपल्या पेक्षा वयाने लहान बॉयफ्रेंडला डेट करत असल्यामुळे तर कधी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेले बिझनेसमन लिलत मोदी यांना यांच्यासोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेत आली होती. मात्र यावेळी सुष्मिता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आणि यामगचं कारण आहे ते म्हणजे, अभिनेत्रीचा बदलेला लूक. सुष्मिता सध्या तिचा आगामी सिनेमा 'ताली'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सुष्मिता मिडीयाशी बोलताना दिसतेय. यावेळी सुष्मिता रॅपिड फायर खेळताना दिसते आहे.
तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरच येताच सोशल मीडिया युजर्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. सुष्मिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओवर युजर्सने अनेक प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत आणि तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
अनेकांनी तिच्या या व्हिडिओवर प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली आहे. एका युजरने कमेंट करत लिहीलंय की, 'ती स्वतःपेक्षा राखी सावंतसारखी दिसतेय' तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय, 'ती नुकतीच हृदयविकाराच्या झटक्यातून वाचलीये. कदाचित दररोज ती 100 औषधे घेत आहे, अर्थातच याचे काही दुष्परिणाम होणारच आहेत. ती आधी खूपच नाजूक होती.' तर अजून एकाने म्हटलंय 'तिचा चेहरा का सुजला आहे.' तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय 'नाही ती सुष्मिता सेन नाहीये' तर अजून एका युजरने कमेंट करत म्हटलंय, तिला कॉस्मेटिक सर्जरी करण्याची गरज का पडली. ती आधीच खूप सुंदर होती' तर अजून एकाने म्हटलंय की, आजकल या अभिनेत्री गाल का फुगवून घेतात. अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स सोशल मीडिया युजर्स तिच्या या व्हिडिओवर करत आहेत. नुकताच 'ताली' या वेबसिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या वेबसीरिजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. तर याचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केलं आहे. ही वेबसीरिज जिओ सिनेमावर प्रदर्शित केली जाणार आहे. या वेबसीरिजचे एकूण ६ एपिसोड असतील, 'ताली' ही वेबसीरिज येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे
'ताली' ही वेबसीरिज तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर आधारित आहे. यात सुष्मिता सेन ही प्रमुख भूमिका साकारत आहे. या वेबसीरिजचा टीझर सध्या चांगलाच चर्चेत आहे.