Did Tamannaah Bhatia Get Breast Implants: अभिनेत्री तमन्ना भाटिया मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहेत. तिच्या अभिनयाबरोबर तिचं सौंदर्य आणि डान्ससाठी तमन्ना ओळखली जाते. सध्या ती रजनीकांत यांच्याबरोबरच्या चित्रपटामधील कावालेया गाण्यामुळे इन्स्टाग्रामपासून सर्वच सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. काही वर्षांपासून ती हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रामुख्याने दिसू लागली असली तरी अनेक वर्षांपासून ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहे. पण सध्या ती इंटरनेटवर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. ही चर्चा आहे तिच्या दिसण्याची.


काय आहे या पोस्टमध्ये?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील 8 वर्षांमध्ये तमन्ना भाटियाचा लूक बराच बदलला आहे. खास करुन तिच्या शरीरयष्टीमध्ये फारच बदल झाल्याचं दिसत आहे. अनेकांनी तमन्नाचा 8 वर्षांपूर्वीचा आणि आताचा फोटो आजूबाजूला लावून शेअर केला आहे. एक फोटो तमन्ना 25 वर्षांची असतानाचा आहे. तर दुसरा फोटो सध्याचा म्हणजेच 33 वर्षांची असतानाच आहे. तमन्नाने मागील काही वर्षांमध्ये सर्जरी केली आहे की थोडेफार बदल आपल्या शरीरामध्ये करुन घेतले आहेत? अशा अर्थाच्या कॅप्शनसहीत रेडइटवर ही पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टला 86 अपव्होट्स मिळाले असून एकूण 73 जणांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत. यावरुन सोशल मीडियावर चर्चाही सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पोस्टवरील प्रतिक्रियांमध्ये 2 गट पडल्याचं दिसत आहे.


पडले 2 गट अन् मतमतांतरे...


25 वर्षांची तमन्ना आणि 33 वर्षांची तमन्ना हे दोन्ही फोटो पाहून काहींनी खरोखरच तमन्नाच्या लूक्समधील बदल पाहता तिने सर्जरी केल्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं आहे. तर अनेकांनी तमन्नाने सर्जरी केल्याचं लॉजिक आपल्याला पटत नाही असंही म्हटलं आहे. "ज्यांना वाटतंय की तिने शस्त्रक्रीया केली आहे त्यांना लायटींग, मेकअप, फोटोग्राफी, अँगल, फोटोशॉप, कपडे, वर्कआऊट्स, ट्रान्सफॉर्मेशनबद्दल जाणून घेण्याची गरज आहे. होय काही लोक शस्त्रक्रीया करुन घेतात पण प्रत्येकजण त्यातला नसतो," असं म्हटलं आहे.



महिलांच्या शरीरात बदल होतात


तर काहींनी या पोस्टमध्ये व्यक्त करण्यात आलेली शंका खरी असल्याचं म्हटलं आहे. "एक सत्य सांगायचं झाल्यास या सर्वांनी स्वत:वर शस्त्रक्रीया करुन घेतल्या आहेत," असं एकाने म्हटलं आहे. तर अन्य एकाने, "तिने स्तनांची शस्त्रक्रीया केली आहे की नाही ठाऊक नाही पण महिलेच्या शरीरामध्ये बदल होतात. 8 ते 10 वर्षांमध्ये शरीरात मोठे बदल होणं ही महिलांसाठी फार सामान्य गोष्ट आहे," असं म्हटलं आहे.