मुंबई : अभिनेता सलमान खानच्या 'तेरे नाम' या चित्रपटातील अभिनेत्री भूमिका चावला तुम्हाला आठवतेय का? २००३मध्ये तेरे नाम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून भूमिकाला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. मात्र या चित्रपटानंतर भूमिका रुपेरी पडद्यावरुन गायब होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेत्री भूमिका चावलाने 2013 मध्ये तेरे नाम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ती फारशी चित्रपटांमध्ये दिसली नाही, यामगचं कारणं तिच्याकडे काम नसल्याचं समोर येत आहे.  तिच्या या भूमिकेची फारशी चर्चाही झाल्याचं कधी दिसलं नाही आणि ती अचानक सिनेसृष्टीतून गायब झाल्याचही मानलं जात होतं पण अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत  याबाबत खुलेपणानं वक्तव्य केलं आहे.


'तेरे नाम (2013) नंतर एका वर्षाने ती आई झाली. 2014 मध्ये तिचा मुलगा यशचा जन्म झाला, त्यानंतर तिचा जीवक्रम बदलला, परंतु याचा अर्थ असा नाही की मी माझं करिअर मागे सोडलं. यशच्या जन्मानंतर सहा महिन्यांनी मी कन्नड चित्रपटात काम केलं.


त्यानंतर मी 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मध्ये काम केलं. त्यानंतर तेलगूमध्ये तीन चित्रपटांमध्ये काम केलं, त्यापैकी एक सुपरहिटही ठरला आणि याचा हिंदी रिमेकही लवकरच बनणार आहे.
माझ्या मुलाच्या जन्मानंतरच्या सात वर्षांत मी चांगलं काम केलं आहे पण मी हिंदी चित्रपटांमध्ये फारसं काम केलं नाही, त्यामुळे मी सक्रिय नाही, असं लोकांना वाटतं मला माझ्या कामावर शांततेनं लक्ष केंद्रित करायला आवडतं आणि मला माझ्या वैयक्तिक जागेचा आनंद घ्यायचा आहे.


४३ वर्षीय भूमिकाने सांगितलं की, साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूडशी संबंधित लोक तिला सतत विचारायचे की ती स्क्रिनवर जास्त का दिसत नाही. भूमिकाने याला प्रत्युत्तर देत सांगितलं की, तिला जास्त प्रसिद्धीझोतात राहणं आवडत नाही पण आता दिसणं आवश्यक आहे हे तिला समजलं आहे.


मातृत्वाबद्दल भूमिका म्हणाली की, तुम्ही तुमच्या मदतीसाठी लोकांना कामावर ठेवू शकता, परंतु मुलासोबत वेळ घालवण्याचं काम दुसरं कोणीही करू शकत नाही. बालपणात त्यांना वेळ देणे आवश्यक आहे. काम कधीच संपत नाही.