कॉलरला धरून अभिनेत्याला मारहाण; सारा गाव गोळा झालेला आणि...; कोण आहे हा सेलिब्रिटी?
Entertainment News : हिंदी कलाजगतातील मोठं कुटुंब, कशाचीच कमी नाही तरीही अशी परिस्थिती का? त्या प्रसंगी नेमकं काय घडलं होतं?
Entertainment News : हिंदी कलाजगतामध्ये आजवर अनेक सेलिब्रिटींना प्रसिद्धी मिळाली, यामध्ये काही चेहऱ्यांनी यशस्वीरित्या त्यांचं वेगळेपम जपलं, तर काहींना त्यांच्या कारकिर्दीत अशा प्रसंगांचा सामना करावा लागला, जिथं त्यांच्यासाठी एकूण स्थिती पूर्णपणे अनपेक्षित होती. अशाच कलाकारांमधील एका चेहऱ्याला चक्क मारही खावा लागला होता.
बसला ना धक्का? हा अभिनेता, हे प्रसिद्ध नाव म्हणजे शशी कपूर. प्रसिद्ध अभिनेता आणि टीव्ही प्रेझेंटर शेखर सुमन यांनी एका मुलाखतीत शशी कपूर यांच्याशी संबंधित या किस्स्यावर भाष्य केलं. 1984 या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'उत्सव' या चित्रपटासंबंधी त्यांनी सांगितलं, ज्यावेळी एका अनपेक्षित आणि तितक्याच भयावह प्रसंगाविषयीसुद्धा सांगितलं. शशी कपूर यांच्यावर असा काही प्रसंग ओढावला होता, जिथं त्यांना गावकऱ्यांनी बेदम चोप दिला होता.
हा प्रसंग इतका गंभीर होता, की शशी कपूर यांच्या मनात भीती बसली होती. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत रेखा यांनीही स्क्रीन शेअर केली होती, इतकंच नव्हे तर या चित्रपटाची निर्मितीही शशी कपूर यांचीच होती. राहिला मुद्दा हा प्रसंग ओढावलाच का, तर त्याचं कारणही समोर आलं.
शेखर सुमन यांच्या माहितीनुसार शशी कपूर यांच्या कारची धडक एका गावकऱ्याला लागली होती. त्याच कारणास्तव कावकऱ्यांनी कारमध्ये असणाऱ्या शशी कपूर यांना बाहेर काढून मारहाण केली. बंगळुरूहून परतताना हा सर्व प्रकार घडला होता. सुमन यांच्या माहितीनुसार तो प्रसंग इतक्या गंभीर वळणावर पोहोचला होता, की गावकऱ्यांचा संताप अनावर झाला होता. त्यांनी कारच्या काचा फोडून अभिनेत्याला कॉलरला धरून बाहेर काढलं आणि मारहाण केली.
हेसुद्धा वाचा : 36 वर्षांपूर्वीचा चित्रपट, 15 दिवस मिळत नव्हते तिकीट, 2 कोटींचे बजेट कमावले इतके कोटी
कारमध्ये असणाऱ्या त्यांच्या मुलाला म्हणजेच कुणाल कपूरलाही त्यांनी मार दिला, अभिनेता राजेशचे केस धरून गावकऱ्यांनी जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. या सर्व प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीला कारची धडक लागली होती, ती व्यक्ती मात्र तिथं असणाऱ्या झाडाखाली बसून चहा पित होती, काहीतरी बडबडत होती. हा सर्व प्रकार अतिशय हादरवणारा होता, असंच शेखर सुमन यांनी सांगितलं.