मुंबई : कॉमेडीचा किंग कपिल शर्मा चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. कपिलने 2007 मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोद्वारे टेलिव्हिजनवर धमाल केली. कपिलने हा शो जिंकला आणि जिंकल्यानंतर खूप प्रसिद्धी मिळवली. त्याने 2013 मध्ये त्याचा स्वतःचा शो 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' लाँच केला, त्यानंतर त्याचं फॅन फॉलोइंग सातत्याने वाढत गेलं. यानंतर त्याने 'किस किसको प्यार करूं' आणि 'फिरंगी' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. पण तुम्हाला माहित आहे का? की, कपिल शर्माने गेल्या अनेक वर्षात अनेक चित्रपट नाकारले आहेत. आज आम्ही तुम्हाला कपिलने नाकरलेल्या अशाच सिनेमांबद्दल सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनीस बज्मी दिग्दर्शित आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क प्रॉडक्शन निर्मित Mubarakan रोमँटिक कॉमेडी चित्रपट  2017 मध्ये आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रथम कपिलशी संपर्क साधला, मात्र कॉमेडियनने ही ऑफर नाकारली. या चित्रपटात अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ, अथिया शेट्टी, नेहा शर्मा आणि रत्ना पाठक यांच्या प्रमुख भूमिका होत्या.


अनिल कपूर, टिस्का चोप्रा आणि मंदिरा बेदी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 2013मधील भारतीय अॅक्शन-थ्रिलर सिरीज होती. मीडिया रिपोर्टनुसार, अनिलने कपिलला एक भूमिका देऊ केली पण त्याने ती नाकारली. कपिल जरी या ऑफरबद्दल खूप उत्साहित होता, पण त्याच्या आगामी शोमुळे त्याला नकार द्यावा लागला.


तेझ - 2012 च्या या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होतं. ज्यात अजय देवगण, अनिल कपूर, कंगना राणौत, झायेद खान, समीर रेड्डी आणि बोमन इराणी मुख्य भूमिकेत होते. मीडिया रिपोर्टनुसार, कपिलला चित्रपटात भूमिका करण्याची ऑफरही देण्यात आली होती, पण त्याने ती नाकारली.


वो सात दिन रीमेक- 1983 मधील 'वो सात दिन' या चित्रपटात अनिल कपूर, पद्मिनी कोल्हापुरे आणि नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत होते. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या रिमेकची योजना आखली जात होती. कपिलला एका भूमिकेसाठी संपर्क साधण्यात आला, पण त्याने ही ऑफर नाकारली.


बँक चोर- रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि रिया चक्रवर्ती स्टारर कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू करू शकला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, कपिलशी या चित्रपटातील एका भूमिकेसाठी बोलले गेलं होतं पण त्याला चित्रपटाची कथा आवडली नाही.