सलमानपेक्षा कितीतरी पटींने श्रीमंत आहे शाहरूख
बॉलिवूडमधील तिन्ही खान आपापली एक वेगळी ओळख निर्माण करून राज्य करत आहेत. तिघांची अभिनयाची शैली वेगळी, चाहते वेगळे तरीही या तिघांचा रूदबा काही औरच आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि शाहरूख खानच्या फॉप सिनेमांचा सिलसिला सुरू आहे. पण असं असलं तरीही या दोघांच्या प्रॉपर्टीमध्ये यांचा हात कुणीच धरू शकत नाही. त्यामुळे शाहरूख जास्त श्रीमंत की सलमान हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आपण आज या चर्चांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या दोघांकडे किती प्रॉपर्टी आहे याचा खुलासा करणार आहोत.
मुंबई : बॉलिवूडमधील तिन्ही खान आपापली एक वेगळी ओळख निर्माण करून राज्य करत आहेत. तिघांची अभिनयाची शैली वेगळी, चाहते वेगळे तरीही या तिघांचा रूदबा काही औरच आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि शाहरूख खानच्या फॉप सिनेमांचा सिलसिला सुरू आहे. पण असं असलं तरीही या दोघांच्या प्रॉपर्टीमध्ये यांचा हात कुणीच धरू शकत नाही. त्यामुळे शाहरूख जास्त श्रीमंत की सलमान हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आपण आज या चर्चांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या दोघांकडे किती प्रॉपर्टी आहे याचा खुलासा करणार आहोत.
प्रॉपर्टीचा विचार केला तर आज दोघांजवळ खानजवळ जवळपास ५५०० कोटी रुपये इतकी प्रॉपर्टी आहे पण सलमानच्या तुलनेत शाहरुख सर्वात जास्त श्रीमंत आहे. शाहरुखजवळ ४००० कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. किंग ऑफ रोमान्स शाहरुख खानने अनेक वर्षे इंडस्ट्रीत स्ट्रगल करत आहे. शाहरुख आज भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक मानला जातो पण गेल्या 2 वर्षापासून शाहरुखचा स्पार्क संपत चालला असल्याचे म्हटले जात आहे.
बॉलिवूडचा भाईजान या नावाने प्रसिद्ध असलेल्या सलमान खानची लोकप्रियता शाहरुखहून कमी नाही. सलमानच्या चित्रपटांसाठी लांबच लांब लाईन लागत असे. आजही युथ सलमानचा चाहता आहे. सलमानचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ट्युबलाईट दणकून आपटल्यामुळे आता सलमानचे दिवस संपत चालले अशी चित्रपटसृष्टीत चर्चा आहे.
सलमान खानचे वडील सलीम खान चित्रपट कथालेखक आणि संवादलेखक आहेत. सलमानला चित्रपटसृष्टीत स्थिरावण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही. सलमानने राजश्री प्रोडक्शनच्या मैने प्यार किया या चित्रपटात काम केले आणि त्याला रातोरात प्रसिद्धी लाभली. त्यानंतर सलमानने मागे वळून पाहिले नाही. मात्र कोणीही गॉडफादर नसतानास चित्रपटसृष्टीत आपले बळकट स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्याच्या यादीमध्ये शाहरुखचे नाव सर्वात वरती घेतले जाते. शाहरुखला १९९२ साली 'दिल आशना है' या चित्रपटातून ओळख मिळाली. ‘दिलवाले दुल्हनिया...’चित्रपटाने शाहरुखला किंग ऑफ रोमान्स ही उपाधी मिळाली.
अमिताभ बच्चन यांच्याइतकीच प्रॉपर्टी आहे शाहरुखची. इंडस्ट्रीत केवळ अमिताभ बच्चनच आहेत ज्यांच्याकडे शाहरुखइतकी प्रॉपर्टी आहे. शाहरुख कॅनडा, मलेशिया, यूएई, ब्रिटेन आणि अमेरिकामध्येही फेमस आहे. विदेशात त्याचे‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’आणि ‘माय नेम इज खान’हे चित्रपट फार लोकप्रिय आहेत.