मुंबई : आयुष्यात असे काही क्षण येतात ज्या क्षणांचा विचार आपण स्वप्नातही करत नाही. अभिनेता  चिरंजीवी सारजा यांच्या मृत्यूनंतर त्याच्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज असलेल्या पत्नी मेघना सरजाने ऑक्टोबर 2020 मध्ये गोंडस मुलाला जन्म दिला. कन्नड चित्रपटसृतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजाचं 7 जून 2020 मध्ये निधन झालं होतं. आता सर्व दुःख विसरत मेघनाने ज्युनिअर चिरंजीवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेघनाने शेअर केलेला बाळाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.  या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Meghana Raj Sarja (@megsraj)


चिरंजीवी आणि मेघनाचं नातं होतं खास... 
लग्नापूर्वी जवळपास १० वर्षांपासून ते एकमेकांचे चांगले मित्र होते. काही दिवसांनी त्यांच्या प्रेमाचे  रूपांतर प्रेमात झालं आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.  चिरंजीवी आणि मेघना राज यांनी २०१८ मध्ये लग्न केलं होतं.