मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'दिल दोस्ती दोबारा' फेम विक्रांत शिंदे (भपाव ) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच विक्रांत शिंदे आणि अस्मिता करंगुटकर यांचा साखरपुडा पार पडला. सोशल मिडीयाच्या माध्यमातून विक्रांतने या बातमीची घोषणा केली आहे.


 



विक्रांत आणि अस्मिताला शुभेच्छा देण्यासाठी ' दिल दोस्ती दोबारा'ची सारी टीम हजर होती. यामध्ये सुव्रत जोशी, सखी गोखले, पुष्कराज चिरपूटकर, अमेय वाघ आणि पूजा ठोंबरे यांच्या समवेत श्रद्धा पोखरणकर व विनोद गायकरनेही  विक्रांत आणि अस्मिताला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती.


 


' तुमचा हुकूम आपला एक्का' हा भपावचा खास डायलॉग रसिकांमध्ये फारच प्रसिद्ध आहे. दिल दोस्ती दोबारामधील सहा मित्रांसोबतच 'भपाव'  ही व्यक्तिरेखाही अल्पावधीतच रसिकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. लवकरच 'दिल दोस्ती दोबारा' रसिकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी ' जागो मोहन प्यारे' ही विनोदी मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.