`Taarak Mehta..` फेम `जेठालाल` आज अभिनेता नसते तर करत असते हे काम
फक्त या कारणामुळे `Taarak Mehta..` मालिकेच्या माध्यमातून `जेठालाल` प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील सर्वात जास्त लोकप्रिय पात्र म्हणजे जेठालाल म्हणजेचं अभिनेते दिलीप जोशी. दिलीप जोशी आज टीव्ही विश्वातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक आहेत. दिलीप जोशी यांनी सलमान खानसोबतही काम केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, एक वेळ अशी आली होती की, दिलीप जोशी काम न मिळाल्याने बेरोजगार झाले होते.
तेव्हा त्यांनी अभिनय क्षेत्राला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या नशिबात 'जेठालाल' पात्र होतं . काम मिळत नसल्यामुळे नाराज झालेल्य दिलीप जोशी यांना अचानक 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत काम करण्यासाठी ऑफर आली. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असित कुमार मोदी ऑफर घेऊन दिलीप जोशींकडे पोहोचले तेव्हा त्यांनी दिलीप जोशींना 'चंपकलाल' ची व्यक्तिरेखा ऑफर केली.
पण दिलीप यांनी निर्मात्यांना सांगितले की, मालिकेत काम करेल तर जेठालाल'ची भूमिका साकारेल. त्यासाठी जेठालाल यांनी प्रचंड मेहनत केली. अखेर असित मोदी यांनी 'जेठालाल' भूमिका साकारण्याची परवानगी दिली. तेव्हापासून 'जेठालाल' प्रेक्षकांच्या भेटीला आले.