Dilip Kumar Health Update : रूग्णालयातील दिलीप कुमार-सायरा बानो यांचा पहिला फोटो
दिलीप कुमार यांच्या चेहऱ्यावर दिसतोय थकवा
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रविवार श्वसनाचा त्रास होऊ लागला. यामुळे तात्काळ त्यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दिलीप कुमार यांच्या तब्बेतीबाबत वेगवेगळ्या अफवासमोर येत होत्या. यावेळी दिलीप कुमार यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानोने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केली आहे. (Dilip Kumar photo from hospital shared online, Saira Banu urges fans to not believe rumours) फोटोवरून दिलीप कुमार यांच्या तब्बेतीची माहिती दिली आहे.
या फोटोत सफेद रंगाचे सूट आणि लाल रंगाचा दुपट्टा सायरा बानो दिलीप कुमार यांना बघत आहेत. आकाशी रंगाचा शर्ट दिलीप कुमार डोळे बंद करून आहेत. फोटोवर तारीख आणि वेळ दोन्ही लिहिलं आहे. या फोटोत दिलीप साहेब अतिशय थकलेले दिसत आहेत.
दिलीप कुमार यांच्या कुटुंबियांनी अधिकृतरित्या ट्विट करून माहिती दिली. दिलीप कुमार व्हेंटीलेटरवर नसून ऑक्सिजन सपोर्टची मदत घेतली आहे. दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून माहिती दिली आहे. सकाळी 11 वाजून 45 मिनिटांचे हे अपडेट आहेत. दिलीप साहेब ऑक्सिजन सपोर्टवर असून व्हेंटिलेटरवर नाहीत. प्लयुरल एस्पिरेशनच्या अगोदर काही टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहिली जात आहे. डॉ. जलील पालकर हे दिलीप कुमार यांच्यावर उपचार करत आहेत.
दिलीप कुमार यांच्या कुटुंबियांनी मीडियाला आग्रह करताना लिहितात की, मीडियाला एक विनंती आहे. दिलीप कुमार यांच्या करोडो चाहत्यांना मीडियाद्वारे माहिती मिळते. त्यामुळे अफवांना रोखून योग्य माहिती देऊन आम्हाला मदत करा. या अकाऊंटवर त्यांच्या तब्बेतीची माहिती दिली जाईल.
सायरा बानो म्हणाल्या, 'दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल केलं आहे. ज्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे, ते कोरोना रूग्णालय नाही. डॉ नितिन गोखले यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरू आहेत. तुम्ही त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करा.' असं देखील सायरा बानो म्हणाल्या.