Dilip Kumar Second Marriage : चित्रपटसृष्टीत अशा अनेक लव्ह स्टोरी होऊन गेल्या आहेत. ज्या आजही प्रेक्षकांच्या मनात छाप सोडून गेल्या आहेत. काही लव्ह स्टोरी आहेत चित्रपटाच्या कथेप्रमाणे असतात. अशी एक लव्ह स्टोरी ही अभिनेत्री सायरा बानो आणि अभिनेता दिलीप कुमार यांची होती. 1-2 नाही तर 22 वर्षांचा वयात फरक असताना दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी लग्न केलं होतं. मात्र, त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या खासगी आयुष्यात मोठा भूकंप आला.  एका अपघातात सायरा बानो यांचा गर्भपात झाला आणि त्यानंतर त्या कधीच आई होऊ शकल्या नाही. यासगळ्यानं दिलीप कुमार हे खूप दु:खी होते. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या लग्न करण्याचा विचार कोणत्या परिस्थितीत केला त्याविषयी आज जाणून घेऊया... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1966 मध्ये सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1972 मध्ये सायरा बानो या प्रेग्नंट होत्या आणि या बातमीनं ते दोघेही खूप आनंदी होते. मग एक दिवस सायरा बानो शूटिंगवरून घरी येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यांचं मिस्कॅरेज अर्थात गर्भपात झाला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्या कधीच आई होऊ शकणार नाहीत. हे ऐकताच दिलीप कुमार आणि सायरा बानो हे खूप निराश झाले.  


दिलीप कुमार यांना त्यांचं स्वत: चं मुल हवं होतं, पण त्यांना सायरा बानो यांच्यावर खूप प्रेम होतं. दिलीप कुमार यांचं कुटुंब त्यांना दुसरं लग्न करण्यासाठी फोर्स करत होते. पण दिलीप कुमार यांना हे मान्य नव्हतं. तरी देखील घरच्यांच्या बोलण्यात येऊन सायरा बानो यांना न सांगता दुसऱ्या शहरात जाणून 1981 मध्ये अस्मा रहमानशी लग्न केलं होतं. पण जवळपास 2 वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. कारण त्यांनी सायरा बानो यांना 2 वर्ष सांगितलं नव्हतं. सायरा बानो यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवणं त्यांना आवडलं नाही. 


हेही वाचा : नताशा स्टेनकोविकनं हार्दिकला घटस्फोट देण्याचं खरं कारण आलं समोर, 'या' गोष्टींमुळे झालेली अस्वस्थ


मीडिया रिपोर्ट्सनुसार, अस्माला घटस्फोट दिल्यानंतर दिलीप कुमारनं सायरा बानो यांना सगळं काही सांगितलं. सायरा बानो यावर चांगल्याच चिडल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की जवळपास 6 महिने त्यांनी दिलीप कुमार यांच्याशी बोलणं बंद केलं होतं. पण त्यानंतर दिलीप कुमार यांना माफ केलं आणि पुन्हा ते एकत्र आले. त्यानंतर त्यांनी कधीच मुलांविषयी चर्चा केली नाही आणि दोघं एकमेकांसोबत आनंदी राहू लागले.