दिलजीत Live Concert मध्ये रडणाऱ्या मुलीबद्दल काय बोलला? `ती फक्त...`
दिलजीत दोसांझ कायमच वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यक्रम करत असतो. देशातील वेगवेगळ्या शहरात कॉन्सर्ट करणाऱ्या दिलजीतचं एक स्टेटमेंट सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.
Diljit Dosanjh Angry On Trolls: पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या 'दिल-लुमिनाटी टूर'मुळे चर्चेत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये गाण्याचे lIVE CONCERT कार्यक्रम करत आहेत. त्याच्या कॉन्सर्टचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडेच त्याने हैदराबादमध्ये शानदार परफॉर्मन्स दिला, जो चाहत्यांसाठी खूप खास होता. याआधी जयपूरमध्ये त्याच्या शोदरम्यान काही मुली इतक्या भावूक झाल्या की त्या रडू लागल्या. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
इतकेच नाही तर त्या मुलींना खूप ट्रोल केले जात आहे आणि त्यांच्यावर मीम्स बनवले जात आहेत. 15 नोव्हेंबरच्या रात्री दिलजीतने आपल्या शो दरम्यान अशा प्रकारची कृत्ये करणाऱ्या ट्रोलवर नाराजी व्यक्त केली होती. आपल्या महिला चाहत्यांचे समर्थन करताना, दिलजीत म्हणाला की, एखाद्याच्या भावना व्यक्त करणे आणि भावनांना अशी वाट करुन देणे हे अगदी सामान्य आहे. तो म्हणाला, 'रडणे चुकीचे नाही. संगीत ही एक भावना आहे, ज्यामध्ये हसणे, नाचणे, पडणे आणि रडणे यांचा समावेश होतो. मी पण संगीत ऐकून खूप वेळा रडलो आहे.
दिलजीत दोसांझ ट्रोल्सवर भडकला
ते पुढे म्हणाले, 'फक्त तेच लोक रडू शकतात ज्यांच्या मनात खोल भावना असतात. मी त्या मुलीला भेटलो आहे. या मुली स्वावलंबी तर आहेतच, पण कमावतात आणि आयुष्याचा आनंद लुटतात. अलीकडेच दिलजीत दोसांझने त्याच्या इंस्टाग्रामवर हैदराबाद कॉन्सर्टची एक क्लिप देखील पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तो प्रेक्षकांना महिलांना आदराने वागवण्यास सांगत आहे. त्याने कॅप्शनमध्ये असेही लिहिले की, 'ज्या महिलेला तिचे महत्त्व समजते तिला कोणाच्याही प्रमाणाची गरज नसते'.
कॉन्सर्ट अगोदर पाठवली नोटीस
त्याने पुढे लिहिले की, 'ती स्वतःचे मार्ग स्वतः शोधू शकते'. आम्ही तुम्हाला सांगतो, दिलजीत दोसांझची ही क्लिप त्याच्या दिल-लुमिनाटी टूर 2024 मधील आहे, ज्यामध्ये लाखो चाहते दिसत आहेत. या शोपूर्वी तेलंगणा सरकारने त्याला नोटीस पाठवली होती, ज्यामध्ये त्याला दारू, ड्रग्ज आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी गाणी न गाण्याची सूचना देण्यात आली होती आणि मुलांना स्टेजवर बोलावण्यासही मनाई करण्यात आली होती. त्यांनी यापैकी कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये लिहिले होते.