मुंबई : बॉलिवूडचे असे काही कलाकार आहेत ज्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भरपूर आवडते. त्यांना पडद्यावर एकत्र पाहून चाहते खूप खूश होतात. यातलीच एक जोडी म्हणजे शाहरुख खान आणि काजोल. या दोघांचा ऑनस्क्रीन रोमान्स, आणि ऑफस्क्रीन मैत्रीने सर्वांनाच वेड लावलं आहे. शाहरुख आणि काजोलने बॉलिवूडमधील अनेक बड्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. जर शाहरुख आणि काजोल एकत्र स्क्रिन शेअर करत असतील, तर हा चित्रपट हिट व्हायलाच हवा. दोन्ही स्टार्सची सगळ्यात खास बाब म्हणजे हे दोघं जेवढं ऑनस्क्रीन प्रेम दाखवतात तेवढच ते ऑफस्क्रिन मस्ती देखील करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक गंमतीदार किस्सा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाच्या सेटवर घडला. जेव्हा शाहरुखने काजोलला उचलुन आपल्या हातात घेतलं आणि मग अचानक खाली पाडलं. चला तर मग जाणून घेवूयात हा मजेदार किस्सा


'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट हिंदी सिनेमाच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात स्टार्सच्या अभिनयापासून ते गाणी, डायलॉग, रोमान्स हे सगळच हिट झालं आहे. 'रुक जा ओ दिल दीवाने' हे गाणं फराह खान यांनी कोरिओग्राफ केलं होतं. या गाण्यात शाहरुख काजोलबरोबर फ्लर्ट करतांना दिसतो आणि गाणं संपताच तो काजोलला खाली पाडतो.


काजोलने एका मुलाखतीत सांगितले होतं की, ''मला हे गाणं कसे शूट करायचं, मला कसे एक्सप्रेशन द्यायचे हे माहित होतं, मात्र शाहरुख आपल्याला खाली पाडणार आहे हे मला माहितीच नव्हतं, ते मला कुणीच सांगितलं नव्हतं.


काजोल पुढे म्हणाली, फराह खानने शाहरुखला गुपचूप सांगितलं होतं की, आधी तू काजोलबरोबर डान्स करायचा आणि मग तू तिला उचलून घ्यायचं आणि खाली पाडायचं. पण तिला हे सांगायचं नाही''. अशा परिस्थितीत जेव्हा सीन शूट झालं होतं, तेव्हा शाहरुखने अचानक तेच केलं आणि मी सरप्राईज झाले. यामुळे प्रेक्षकांना हा सीन खूप आवडला, कारण माझे एक्सप्रेशन पूर्णपणे नॅच्यूरल होते''.


शाहरुख आणि काजोलचे या चित्रपटाशी संबंधित इतरही खूप किस्से प्रसिद्ध झाले आहेत. असं म्हटलं जातं की, आदित्य चोप्रा आणि यश राज यांना या चित्रपटात अ‍ॅक्शन सीन घ्यायची इच्छा नव्हती, मात्र शाहरुख खानच्या सांगण्यावरून या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये मारमारीचे सीन होते. शाहरुख म्हणाला की, डीडीएलजे हिट होण्यामागील एक कारण म्हणजे क्लायमॅक्समध्ये  अ‍ॅक्शन सीन ठेवण्यात आले होते.


शाहरुख आणि काजोलची जोडी या सिनेमातही सुपरहिट ठरली. डीडीएलजे व्यतिरिक्त शाहरुख आणि काजोल 'कुछ कुछ होता है', 'बाजीगर', 'कभी खुशी कभी गम', 'माय नेम इज खान' आणि 'दिलवाले' या चित्रपटांमध्ये दिसले आहेत