मुंबई : 80 आणि 90 च्या दशकात अभिनेत्री अगदी लहान वयातच चित्रपटांमध्ये आल्या. त्यामुळे त्या काळातील अभिनेत्यांबरोबरच त्या अभिनेत्रींनी त्या अभिनेत्यांच्या मुलांबरोबर रोमान्स केला. या यादीत डिंपल कपाडिया ते माधुरी दीक्षित यांच्या नावांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिंपल कपाडिया: अभिनेत्री डिंपल कपाडि यांनी (Dimple Kapadia) अभिनेता ऋषी कपूरसोबत 'बॉबी' या हिट चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पण काही दिवसातच डिंपल यांनी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला.  त्यानंतर डिंपल यांनी विनोद खन्नासोबत 'खून का कर्ज' आणि 'विभाजन' या चित्रपटात काम केले. त्यानंतर अनेक वर्षांनी डिंपल यांनी विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्नासोबत 'दिल चाहता है' या चित्रपटात रोमान्स करत होत्या. 


हेमा मालिनी : ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) यांनी जवळपास प्रत्येक सुपरस्टारसोबत काम केले. त्यापैकी एक होते राज कपूर. राज कपूर यांच्यासोबत हेमा यांनी 'सपने के सौदागर' या चित्रपटात काम केलं. त्यानंतर काही वर्षांनी हेमा मालिनी यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत चित्रपटात रोमान्स केला.


श्रीदेवी: बॉलीवूडची पहिली महिला सुपरस्टार अशी ओळख मिळविणारी अभिनेत्री श्रीदेवीने (Sridevi) यांनी धर्मेंद्रसोबत 'नाकाबंदी' चित्रपटात काम केले. बऱ्याच वर्षांनी त्यांनी 'चालबाज'मध्ये सनी देओलसोबत काम केले आणि दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडली होती.


जया प्रदा : (Jaya Prada) जया प्रदा या त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. जया प्रदा धर्मेंद्रसोबत 'गंगा तेरे देश में', 'शहजादे', 'फरिश्ते' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसल्या. यानंतर त्यांनी सनी देओलसोबत 'वीरता' या चित्रपटात जबरदस्त काम केले.


माधुरी दीक्षित : माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit) देखील अशा अभिनेत्रींच्या यादीत समावेश आहे ज्यांनी चित्रपटात वडील आणि मुलगा दोघांसोबत रोमान्स केला होता. सगळ्यात आधी माधुरीनं विनोद खन्नासोबत 'दयावान' चित्रपटात काम केले आणि नंतर 'मोहब्बत' चित्रपटात अक्षय खन्नासोबत काम केलं. या चित्रपटातील गाणीही खूप लोकप्रिय ठरली होती. (dimple kapadia hema malini sridevi jaya prada madhuri dixit actress who has romanced with both father and son onscreen)