Dimple Kapadia Twinkle Khanna: बॉलिवूडमध्ये उतारवयात अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या अभिनयाचा जलवा दाखवताना दिसत आहेत. त्यातील सर्वात मोठं उदाहरण आहे ते म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन यांचे. वयाच्या 81 व्या वर्षीही त्यांचा तो जसबा अजूनही कायम आहे. त्यामुळे आजही त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षक गर्दी करताना दिसतात. त्यातून आज असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे काम पाहून आपल्यालाही म्हणताच येणार नाही की त्यांचे वय उलटून गेले आहे. त्यातीलच एक नावं सध्या गाजते आहे आणि ते म्हणजे डिंपल कपाडिया यांचे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी 'सास बहु और फ्लेमिंगो' या वेब शोमधून साकारलेली आगळीवेगळी भुमिका सध्या प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या या वेबसिरिजची चर्चा आहे. परंतु ही वेबसिरिज स्विकारण्यामागील खरं कारण त्यांनी आपल्या एका मुलाखतीतून स्पष्ट केले आहे. 


हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या की, ''मला जेव्हा हा रोल ऑफर झाला तेव्हा माझ्या मनात अनेक गोष्टी होत्या. मला हा रोल ऑफर झाल्यावर असं कळलं की दुसरंच कोणतरी हा शो करतं आहे. परंतु मला हा शो करण्याची इच्छा होती माझ्या मनात भिती असली तरी. मग मी या शोमध्ये आले. शुटिंग सुरू व्हायच्या तीन महिने अगोदर मी या शोपासून पळून जायचा प्रयत्न करत होते. मी फार मनापासून प्रयत्न करत होते. अगदी शुटिंगच्या दोन दिवसांपुर्वी माझ्या मनात हाही विचार आला की कुठेतरी दया दाखवून मी या शोमधून बाहेर पडू शकेन. मी अगदी माझ्या वकीलालाही विचारलं होतं परंत मला काही यश आलं नाही. परंतु जे झालं ते चांगलंच झालं.''


हेही वाचा  - ''दुसऱ्या प्रेगंन्सीनंतर...'', 40 व्या वर्षी IVF नं आई आलेल्या अभिनेत्रीनं सांगितला स्तनपानाचा अनुभव


आपल्याला आपल्या लेकीनंच हे काम करायला जबरदस्तीनं ओढलं असं त्या सांगतात. त्या म्हणतात की, ''मला असं वाटतं नव्हतं की या वयात मी काम करू शकेन. मी घरात बसूनही राहिले असते. परंतु माझ्या मुली मात्र मला सारख्या नवं काम करण्यासाठी आग्रह करत होत्या. त्यांना मी म्हणाल्या की मला आता काम करायचे नाही कारण माझी अवस्था आता कमजोर होत जाते आहे. त्यातून मला काम करण्याची इच्छाही नाही त्यावर माझी मुलगी ट्विंकल म्हणाली, अगं तूला पैसे हवेत ना मग आपली व्हॅनिटी घरी ठेव आणि कामावर जा''


डिंपल कपाडिया यांनी 'सास बहू और फ्लेमिंगो' या वेबशोमधून ओटीटीवर पदार्पण केले होते. याच वर्षी त्यांचा 'तू झुठी मैं मक्कार' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.