Rishi Kapoor यांनी दिलेली अंगठी Dimple Kapadia यांनी समुद्रात का फेकली...
बॉलिवूडचे लीजेंड्री स्टार ऋषि कपूर आणि डिंपल कपाडिया यांनी `बॉबी` चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
मुंबई : बॉलिवूडचे लीजेंड्री स्टार ऋषि कपूर आणि डिंपल कपाडिया यांनी 'बॉबी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा सिनेमा रिलीज होताच सुपरहिट झाला आणि त्यासोबत ऋषि आणि डिंपल यांच्या लव्हस्टोरीच्या चर्चाही होवू लागल्या. असं म्हटलं जातं की, हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. एवढंच नव्हे तर, ऋषिजींनी तर डिम्पल यांना प्रेमाची निशाणी म्हणून अंगठी देखील दिली होती.
मात्र, या दोघांची लव्हस्टोरी जास्त काळ टिकू शकली नाही. काही दिवसांतच या दोघांच्या लव्हस्टोरीचा दि एण्ड झाला. ऋषि कपूरचे वडील राज कपूर यांना हे नातं मान्य नव्हतं. ऋषि आणि डिम्पल यांच्या नात्याला त्यांचा तीव्र विरोधात होता. मात्र, ऋषिपासून विभक्त झाल्यावर डिंपल राजेश खन्ना यांना भेटल्या. या नंतर हे दोघंही एकमेकांना डेट करु लागले. हळूहळू हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.
राजेश खन्ना यांना ऋषि कपूर आणि डिंपल यांच्या अफेरविषयी माहिती होतं. त्यांना हे देखील माहित होतं की, डिंपल यांनी घातलेली अंगठी ऋषि कपूर यांनी डिंपल यांना दिली होती अशा परिस्थितीत, राजेश खन्ना यांनी डिम्पल यांना ऋषि कपूर यांनी दिलेली अंगठी समुद्रात फेकायला सांगितलं ... आणि डिंपल यांनीही तसंच केलं.
यानंतर राजेश खन्ना आणि डिंपल यांचं लग्न झालं. राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केल्यानंतर डिंपल बरेच दिवस मोठ्या पडद्यापासून दूर होत्या. 1985 साली आलेला 'सागर' चित्रपटातून त्यांनी कमबॅक केला होतं. या सिनेमात ऋषि कपूरच हिरो म्हणून होते.