मुंबई : टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त 'बिग बॉस ११' या कार्यक्रमाला आता जवळपास महिना पूर्ण झालाय. या दरम्यान प्रेक्षकांना घरातील सर्व सदस्यांचे वेगवेगळे रंग पाहायला मिळालेत... अशातच 'वाईल्ड कार्ड'च्या निमित्तानं ढिनचॅक पूजाला घरात एन्ट्री मिळालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्याच आठवड्यात आपले टास्क योग्य पद्धतीनं पूर्ण न केल्यामुळे घरातील इतर सदस्यांनी पूजाला घरातील तुरुंगात धाडलं. 


'बिग बॉस'नं पूजाला एक टास्क दिला होता. यामध्ये पूजाला घरातील सदस्यांवर एक गाणं बनवायचं होतं. हे गाणं पूजानं तयारही केलंय... आणि या गाण्याचा व्हिडिओ 'बिग बॉस'च्या ऑफिशिअर ट्विटर हॅन्डलवरून लोकांसोबत शेअरही करण्यात आलाय. 


या गाण्यात घरातील सर्व लोक एकत्र दिसत आहेत... आणि ढिनचॅक पूजा घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर एका-एका ओळीत गाणं म्हणतेय... 


अर्थातच, कोणत्याही ताला-सूराविना पूजाचं हे गाणं 'बिग बॉस'च्या प्रेक्षकांना ऐकावं लागणार आहे... परंतु, घरातील सदस्यांबद्दल तिनं वापरलेले शब्द तुम्हालाही नक्कीच आवडतील... या गाण्यात पूजानं सलमान खानचाही उल्लेख केलाय.