मुंबई :  बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया आजकाल त्याच्या वेब सीरिज 'द एम्पायर'साठी चर्चेत आहे. या वेब सिरीजमधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. अलीकडेच, एका मुलाखतीदरम्यान, त्याने बॉलिवूडमधील सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं. डिनो मोरियाने बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1999 साली 'प्यार में कभी कभी' या चित्रपटातून केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितलं की, त्याच्या कारकिर्दीत त्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. त्याने सांगितलं की, तो चित्रपटसृष्टीत स्वतःला टिकवण्यासाठी छोटी छोटी काम करायचा. बॉलिवूडमध्ये त्याला अपेक्षित असलेली मान्यता मिळू शकली नाही. तो बराच काळ चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, त्याच्या अभिनयाचं आजही कौतुक केलं जातं. त्याने 2010मध्ये चित्रपटांमधून ब्रेक घेतला.


यामुळे डिनोने चित्रपटांमधून घेतला ब्रेक 
मुलाखतीदरम्यान तो पुढे म्हणाला की, त्याला त्याच्या कारकिर्दीत परिपूर्ण भूमिका मिळत नसल्याने चित्रपटातून ब्रेक घेतला, आणि दिल्लीतील अभिनय शाळेत प्रवेश घेतला आणि अभिनयाचं शिक्षण घेतलं. तो म्हणाला, "15 चित्रपटांमध्ये अभिनय करूनही मी कधीही अभिनय शाळेत गेलो नाही. म्हणून मी दिल्लीच्या अभिनय शाळेत प्रवेश घेतला.


तो पुढे म्हणाला, "2013 पासून मी निर्माते आणि दिग्दर्शकांशी संपर्क साधून पुन्हा स्वत:ला धक्का देण्यास सुरुवात केली, पण काहीही चांगलं घडलं नाही. मी माघार घेतली आणि योग्य संधीची वाट पाहिली." दिनो म्हणाला की, 2017 मध्ये मेंटल हूड, त्यानंतर होस्टेज आणि तांडव यांनी त्याला द एम्पायरसाठी प्रोत्साहित केलं.