Ramayan Actress Reel: रामायण (Ramayan) या मालिकेनं आत्तापर्यंत अनेक प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. आजही ही मालिका सगळे प्रेक्षक आवडीनं पाहतात. ही मालिका लॉकडाऊनमध्येही करोडो प्रेक्षकांनी पाहिली होती. या मालिकेतून सीता म्हणून घराघरात पोहचलेल्या अभिनेत्री दीपिका चिखालिया (Dipika Chikhila in Ramayan) यांच्या एका पोस्टनं सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधलं आहे. नुकत्याच त्यांनी पोस्ट केलेल्या रीलमुळे त्या खूप ट्रोल झाल्या आहेत. नुकताच दीपिका चिखलिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ (Transformation VIDEO) शेअर केला आहे. (Dipika Chikhila reel ramayan actress dipika chikhila gets trolled for her latest look on instagram reel goes viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक वर्षांपासून दीपिका चिखलिया (Dipika Chikhila Trolled) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या अनेकदा रामायण मालिकेतील थ्रॉबेक व्हिडीओ (Throwback Video) आणि फोटो पोस्ट शेअर करताना दिसतात. व्हिडिओमध्ये (Video) त्यांचा लूक नाईट सूटमध्ये दिसतो आहे नंतर त्या रीलमध्ये एका सुंदर हिरव्या ड्रेसमध्ये दिसतात. मात्र, नेटकऱ्यांनी या पोस्टला काही फारशी दाद दिलेली नाही. त्याउलट त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. "चेन्जेसेस एन्ड ट्रान्सफॉर्मेशन:)" असे कॅप्शन असलेलं त्यांचं शेअर सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहे. 


आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दीपिकाने व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओवर पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या तर अनेकांनी त्यांना सपाटून ट्रोल केलं आहे. "तुम्हाला हे सगळं शोभत नाही," अशी एका वापरकर्त्याने कमेंट केली आहे.


दुसर्‍या यूजरने लिहिले, "तुमची प्रत्येक घरात आदरानं पुजा केली जाते पण आज तुमचा असा अवतार का." "तुमच्या सीतेच्या सभ्य प्रतिमेनुसार हे तुम्हाला शोभत नाही," अशी दुसऱ्या एका व्यक्तीने कमेंट केली. एका यूजरने लिहिले की, "तुम्हाला सगळे सीता माच्या रूपात पाहतात कृपया अशी पोस्ट करू नका." याआधीही दीपिका यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते.  


आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे


दीपिकाने दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या लोकप्रिय टीव्ही मालिका 'रामायण' मध्ये अभिनेता अरुण गोविल (Arun Govil) (राम) आणि सुनील लाहिरी (लक्ष्मण) सोबत सीतेची भूमिका साकारली होती. शोचा प्रभाव इतका जबरदस्त होता की इतक्या वर्षांनंतरही चाहते अरुण आणि दीपिका यांनाच खरे भगवान राम आणि देवी सीता मानतात आणि त्यांचे आशीर्वादही घेतात.