बाळाला जन्म दिल्यानंतर आता अशी दिसतेय दीपिका; पतीनं फोटो शेअर करताच वळल्या नजरा
Dipika Kakar with her Baby : दीपिका कक्करनं नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर आता दीपिका कशी आहे हे पाहण्यासाठी तिचे चाहते उस्तुक असताना तिचा पती शोएबनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना तिच्या आरोग्याविषयी सांगितले आहे.
Dipika Kakar with her Baby : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कडनं 21 जून रोजी तिच्या मुलाला जन्म दिला आहे. तिचं हे बाळ प्रीमॅच्युअर आहे. त्यामुळे तिच्या बाळाला कोणी कुशीत घेऊ शकत नाही. दीपिका आता रुग्णालयात असून तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या वेळी शोएब इब्राहिमनं शेअर केलेल्या या व्हिडीओत दीपिका आणि त्यांची मुलाच्या आरोग्याविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत.
दीपिकानं बाळाला जन्म दिल्यानंतर शोएबनं त्याची सध्या चांगलीच गाजत असलेली मालिका 'अजूनी' च्या सेटवर परतला आहे. त्यासोबतच मालिकेच्या सेटवर या बाळाच्या जन्मानंतर सेलिब्रेशन देखील करण्यात आलं. त्या दरम्यान, शोएबनं 'ईटाइम्स टीवी' ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तो म्हणाला की त्याच्या पेक्षा त्याच्या घरचे त्याच्या वाढदिवसासाठी उत्सुक होते. सगळे त्याचे लाड करत होते. रिजा आणि रिदान देखील सारखे दिवस मोजत होते की त्यांच्या भावाचा वाढदिवस कधी येईल आणि ते त्याला सरप्राइज देतील.
त्यानंतर पुढे शोएब त्याच्या मुलाच्या जन्माविषयी देखील बोलला आहे. त्यानं सांगितलं की त्याच्या मुलाचा प्रीमॅच्युअर जन्म झाला आहे. पण तरी तो सगळ्यांना प्रार्थना करत आहे सगळ्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तो म्हणाला, "जसं तुम्हाला माहित आहे की मला आणि दीपिकाला मुलगा झाला आहे, पण आम्ही सध्या त्यावर जास्त बोलायचे नाही असे ठरवले आहे. कारण तो प्रीमॅच्युअर आहे आणि डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहे. तर मला फक्त तुम्हाला हेच सांगायचे आहे की तुम्ही प्रार्थना करा."
शोएबनं त्या आधी दीपिकाचा रुग्णालयात असतानाचा एक फोटो देखील शेअर केला. त्या फोटोत दीपिका ही रुग्णालयात एका बेडवर असल्याचे दिसत आहे. तर तिच्यासमोर जेवणाचा ट्रे आहे. तर फोटोत हे पाहून हसत आहे. त्या दरम्यान, ती थोडी अशक्त असल्याचे पाहायला मिळाले. पण हा फोटो शेअर करत शोएबनं ती ठीक असल्याचे सांगितले. त्यासोबतच रेड हार्ट इमोजी देखील कॅप्शनमध्ये दिलं आहे.
हेही वाचा : इंटिमेट सीन अन बरंच काही... नवाजुद्दीनहून 28 वर्षांनी लहान अभिनेत्री जरा थेटच बोलली
दरम्यान, काही दिवसांपूर्वी दीपिकानं जुळ्या मुलांना जन्म दिल्याची चर्चा सुरु होती. अशात तिनं आणि शोएबनं एक व्हिडीओ शेअर करत ही अफवा असल्याचं सांगितलं होतं. आता मात्र, दीपिकानं खरंच मुलाला जन्म दिला आहे.