Karan Johar Ex - Boyfriend: करण जोहरचा (Karan Johar) लोकप्रिय शो कॉफी विथ करणमध्ये (Coffee With Karan) सेलिब्रेटींच्या पर्सनल लाईफबद्दल चर्चा केली जाते. तसेच त्यांच्या पर्सनल आयुष्यातील अनेक किस्सेही शेअर केले जातात. आता नुकत्याच झालेल्या एका एपिसोडदरम्यान करण जोहरच्या शोमध्ये पाहूण्यांनी हजेरी लावली होती. (New Episode of Coffee With Karan) (director karan johar dated famous bollywood director and varun dhawan father david dhawan video viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया सेन्सेशन तन्मय भट्ट (Tanmay Bhatt) आणि दानिश सैत (Danish Sait) आणि लोकप्रिय कन्टेंट क्रिएटर कुशा कपिला (Kusha Kapila) आणि निहारिका एनएम (Niharika NM) करण जोहरच्या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमात कॉफी विथ करण अवॉर्ड (Coffee With Karan Award Show) असा नवा शो जज करण्यासाठी हे पाहूणे आले आहेत. आणि यावेळी करण जोहर कोणाला प्रश्न विचारण्यापेक्षा आलेले पाहूणे करण जोहरला प्रश्न विचारणार आहेत. 


करण जोहरचा Ex Boyfriend कोण आहे?


या शोमध्ये आलेले पाहूणे करणला प्रश्न विचारून भांडावून सोडणार आहेत. कुशा कपिला (Kusha Kapila), तन्मय भट्ट (Tanmay Bhatt), दानिश सैत (Danish Sait) आणि निहारिका एनएम  (Niharika NM) एकत्र करणला विचारतात की त्याचा Ex Boyfriend कोण होता? तो प्रसिद्ध आहे का? तो त्यांच्या ओळखीचे कोणी आहे का? पण करण जोहर 'ओ माय गॉड' म्हणतो आणि त्यांच्या प्रश्नाला धूडकावून लावतो आणि म्हणतो, ''माझ्या शोमध्ये मला इतका ताण कधीच आला नाही. मला खरच घाम येत आहे.”


दरम्यान तन्मय भट्ट करण जोहरला विचारतो की त्याने डेव्हिड धवनला (David Dhawan) डेट केले आहे का? या प्रश्नावर प्रथम करण आश्चर्यचकित झाला आणि नंतर तो हसत म्हणाला की मी डेव्हिड धवनला कधीच डेट केले नाही. (Karan Johar Confess)



कॉफी विथ करण सीझन 7 चा नवीन प्रोमो व्हिडिओ (Promo Video) व्हायरल झाला आहे.