मुंबई : व्यंगात्मक सिनेमा 'जाने भी दो यारो'मुळे बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सिने दिग्दर्शक कुंदन शाह यांचा शनिवारी पहाटे राहत्या घरी निधन झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते ६९ वर्षांचे होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचं निधन झालंय.


'जाने भी दो यारो'


शाह यांनी पुण्यातील एफटीआयआयमधून शिक्षण घेतलं होतं... तसंच १९८३ मध्ये आलेल्या 'जाने भी दो यारो'पासून फिचर फिम्ल्सच्या जगात त्यांनी पाऊल ठेवलं होतं. जरी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर 'हीट' ठरला नसला तरी या सिनेमानं एक वेगळा दर्जा प्राप्त केला. या सिनेमासाठी शाह यांना पहिला आणि एकमात्र राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाह यांनी २०१५ मध्ये एफटीआयआयमध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान आपला राष्ट्रीय पुरस्कार परत केला होता.


छोट्या पडद्यावर पदार्पण


१९८६ मध्ये 'नुक्कड' या मालिकेसोबत त्यांनी छोट्या पडद्यावर पाऊल ठेवलं होतं. १९८८ मध्ये आलेल्या 'वागले की दुनिया' या मालिकेचं दिग्दर्शनही त्यांनी केलं... ही मालिका कार्टुनिस्ट आर के लक्ष्मण यांच्या 'आम आदमी'च्या पात्रावर आधारित होती.


'क्या कहना'


शाह यांनी १९९३ मध्ये शाहरुख खान अभिनीत 'कभी हां कभी ना' या सिनेमासोबत बॉलिवूडमध्ये पुन:पदार्पण केलं. २००० मध्ये प्रिती झिंटा, सैफ अली खान अभिनीत सिनेमा 'क्या कहना' बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला. यानंतर त्यांनी काही सिनेमे बनवले... परंतु, व्यावसायिक सफलतेपासून ते दूरच राहिले.