Radhika Apte Unrecognisable Look : चौकटीबाहेरच्या भूमिकांना रुपेरी पडद्यावर न्याय देत त्या भूमिका तितक्याच ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अभिनेत्रींची संख्या हिंदी कलाविश्वात दिवसागणिक वाढत आहे. अमुक एका धाटणीचेच चित्रपट साकारण्यापेक्षा अभिनय कौशल्य आणखी खुलवण्याचाच प्रत्येक अभिनेत्रीचा अट्टहास असतो. अशीच आपलं वेगळेपण सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. बोल्ड आणि बिनधास्त भूमिका ही राधिकाची ओळख. त्याला जोड मिळते ती म्हणजे तिच्या अभिनयाची. सध्याच्या घडीला यशस्वी अभिनेत्रींमध्ये राधिकाही गणली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधिका आपटेने चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अलीकडेच, तिचा नवीन चित्रपट 'मोनिका ओ माय डार्लिंग' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रसारित करण्यात आला आहे, जो टॉप 10 यादीत पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. दरम्यान, राधिका आपटेचा असा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे जो पाहून तुम्हीही तिला ओळखू शकणार नाही.


फोटो व्हायरल
हा फोटो काही वेळापूर्वी राधिका आपटेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता जो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये राधिका आपटे लहान आणि विस्कटलेल्या केसांमध्ये दिसत आहे. तिने घातलेले कपडेही अतिशय घाणेरडे दिसत आहेत. वास्तविक, राधिकाचा हा लूक तिच्या २०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'पार्च्ड' या लोकप्रिय चित्रपटातील आहे. या सिनेमात राधिका आपटेने लज्जोची भूमिका साकारली होती, ज्याची खूप चर्चही झाली.


इंटिमेट सीन्समुळे चित्रपट प्रसिद्धीझोतात आला
राधिकाचा 'पार्च्ड'ही याच कारणामुळे चर्चेत आला होता कारण या चित्रपटात तिने सहकलाकार आदिल हुसैनसोबत अनेक इंटिमेट सीन्सही दिले होते. आजही सोशल मीडियावर राधिका आणि आदिलच्या बोल्ड सीन्सचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. गुजरातच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या या सिनेमात सुरवीन चावला, तनिष्ठा चॅटर्जी आणि लहर खान यांसारख्या अभिनेत्रींनी काम केलं होतं.


राधिका आपटेने 'मोनिका ओ माय डार्लिंग' चित्रपटात एसीपी नायडूची भूमिका साकारली आहे. जरी या सिनेमात तिची भूमिका छोटी असली तरी प्रत्येक फ्रेममध्ये ती चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली. त्याचबरोबर या चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये राजकुमार राव, हुमा कुरेशी, आकांशा रंजन कपूर यांचा समावेश आहे. वसंत बाळा दिग्दर्शित या चित्रपटाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.