मुंबई : अभिनेत्री दिशा परमार आणि अभिनेता राहुल वैद्य खरंच आई-बाबा होणार आहेत? या प्रश्नाने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. नुकताचं दिशा-राहुलला डीनर डेट दरम्यान एकत्र स्पॉट करण्यात आलं. यानंतर दिशा प्रेग्नेंट आहे का? याच एका प्रश्नाने जोर धरला आहे. डेट दरम्यानचा त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या या फोटोवर युजर्स कमेंट आणि लाईक करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोमध्ये दिशा आणि परमार फार सुंदर दिसत आहेत. फोटोमध्ये दिशाने ओव्हरसाईज शर्ट घातलं आहे. ज्यामुळे तिला 'तू प्रेग्नेंट आहेस का?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर दिशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.



 इन्स्टा स्टोरीमध्ये दिशा म्हणते, 'मी पुन्हा कधी ओव्हरसाईज टी-शर्ट घालणार नाही. ज्या लोकांना जाणून घ्यायचं आहे... त्यांच्यासाठी मी प्रेग्नेंट नाही...' सध्या दिशाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


दिशा आणि राहुलने गेल्या वर्षी 16 जुलै रोजी लग्न केलं.  बिग बॉस 14 शो दरम्यान राहुलने दिशाला प्रपोज करत प्रेम व्यक्त केल. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.